असं काय आहे महिलांच्या शरीरात ज्यामुळे त्या पुरुषांपेक्षा जास्त काळ जगतात

Published : May 27, 2026, 05:54 PM IST
woman and man age

सार

पुरुषांचा जीवनकाळ महिलांपेक्षा जगभरात का कमी आहे, यावर काही महत्त्वाचे मुद्दे शास्त्रज्ञ तसेच संबधित अभ्यासकांनी मांडले आहेत. महिलांच्या शरीरात असं नेमकं काय आहे, ज्यामुळे त्याचं आयुष्य वाढतं.

मुंबई : जगभरातील सरासरी काढली तर पुरुषांपेक्षा महिला जास्त दिवस जगतात, म्हणजेच महिलांचं पुरुषांपेक्षा जीवनमान जास्त आहे. जागतिक सरासरीत महिला आपल्या पुरुष मित्रापेक्षा तसेच भावापेक्षा 5 वर्ष जास्त जगतात. पण महिलांचं आयुर्मान पुरुषांपेक्षा जास्त का आहे, हे अजूनही तेवढं स्पष्ट नसलं तरी, काही कारणं सांगितली जात आहेत. ती निश्चितच जाणून घेण्यासारखी आहेत. शास्त्रज्ञांनी काही तर्क लावलेले आहेत.

व्हियतनामसारख्या देशात तर महिला पुरुषांपेक्षा जास्त दिवस जगतात. पण आफ्रिकन देशात जवळ-जवळ सारखेच जगतात. पुरुषांचे महिलांपेक्षा आयुष्य कमी असण्याचं कारण, धूम्रपान आणि दारुचे व्यसन हे प्रमुख कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.

पण दुसरं एक प्रमुख कारणंही समोर आलेलं आहे, पुरुष महिलांच्या तुलनेत अनेक देशात जोखिम असलेलं काम करतात, ज्याच्यात त्यांचा मृत्यू होतो. रस्ते अपघातात महिलांपेक्षा पुरुषांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त आहे. आत्महत्येत देखील जास्त पुरुष जीव गमावतात.

यात आणखी एक कारण आहे, महिलांच्या तुलनेत पुरुषांचं खानपान कसदार नाहीय. या उलट बाहेरचे निकृष्ट खाद्यपदार्थ खाण्यात पुरुष आघाडीवर आहेत. पण यामुळेच त्यांचं आरोग्य अधिक खराब होतं. पुरुष महिलांच्या तुलनेत डॉक्टरांकडे कमी जातात. काही होणार नाही, यावर पुरुष जास्त विसंबून असतात.

पुरुषांनी जीवनशैली बदलली तरी देखील जगण्याच्या बाबतीत ते महिलांपेक्षा कमीच जगतात, कारण महिलांचं शरीर जैविक दृष्टीकोनातून पुरुषांच्या तुलनेत अधिक मजबूत आहे.

स्पेन देशातील व्हेलेंसिया विद्यापीठात वय वाढण्यावर शोध घेणाऱ्या फिजिओलॉजिस्ट प्रोफेसर कान्सुएलो बोर्रासने याबाबतीत सांगितलं की, महिलांमध्ये लैंगिक हार्मोन एस्ट्रोजन महत्त्वाचं आहे. हेच हार्मोन्स महिलांच्या शरीरात अनेक बाबतीत रक्षणाचं काम करतं.

एस्टोजेनमुळे महिलांच्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल देखील कंट्रोलमध्ये राहतं. लघवीत होणारं संक्रमण, डोकं आणि हाडांची रक्षा करण्यातंही महत्त्वाचं ठरतं.

 

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Navratri 2026 Fashion: जुन्या कपड्यांना द्या नवा लूक, नवरात्रीसाठी ९ भन्नाट आयडिया!
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स