अनेक महिलांना मंगळसूत्राला सेफ्टी पिन लावण्याची सवय असते. पण तज्ज्ञांच्या मते, असं करणं ज्योतिषशास्त्र आणि आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगलं नाही. याशिवाय यामुळे मंगळसूत्राच्या साखळीचंही मोठं नुकसान होतं. हे नेमकं कसं होतं?
आपल्या संस्कृतीत मंगळसूत्राला खूप महत्त्व आहे. त्यामुळे महिला ते खूप जपतात. पण साडी नेसताना किंवा इतर वेळी मंगळसूत्राला अनेक जणी सेफ्टी पिन लावतात. काही जणी साखळीची लांबी कमी-जास्त करण्यासाठीही पिन वापरतात. पण तज्ज्ञ सांगतात की ही सवय अजिबात चांगली नाही. यामागचं नेमकं कारण काय?
25
साखळीवर ओरखडे पडतात
सेफ्टी पिनचा धातू साखळीवर सतत घासला गेल्याने त्यावर छोटे ओरखडे पडण्याची शक्यता असते. एकदा पिन लावल्याने कदाचित नुकसान दिसणार नाही, पण रोजच्या वापराने हे ओरखडे वाढू शकतात. विशेषतः नाजूक डिझाईन आणि बारीक साखळी असलेल्या मंगळसूत्रांची जास्त काळजी घेणं गरजेचं असतं.
35
साखळी तुटण्याची भीती
सेफ्टी पिन नीट बंद केली नाही किंवा हालचाल करताना उघडली, तर ती साखळीच्या बारीक कड्यांमध्ये अडकू शकते. यामुळे साखळी वाकण्याचा किंवा अचानक तुटण्याचा धोका असतो. तसेच, मंगळसूत्र कपड्यांना पिन केल्यास उठताना-बसताना साखळीवर ताण पडतो. या ताणामुळे साखळीचे नाजूक भाग खराब होऊ शकतात.
सेफ्टी पिन जास्त वेळ त्वचेला लागून राहिल्यास, त्यातील धातूंमुळे संवेदनशील त्वचा असलेल्यांना ॲलर्जी होऊ शकते. विशेषतः पिनमधील निकेलमुळे खाज सुटणे, त्वचा लाल होणे किंवा पुरळ येणे असे त्रास जाणवू शकतात. घाम आणि घर्षणामुळे ही समस्या आणखी वाढू शकते.
55
ज्योतिषशास्त्र काय सांगतं?
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळसूत्र हे वैवाहिक जीवन आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं. लोखंड हा शनी देवाशी संबंधित धातू आहे. सेफ्टी पिनमध्ये साधारणपणे लोखंड किंवा स्टील असतं, ज्याचा संबंध शनी ग्रहाशी जोडला जातो. त्यामुळे सेफ्टी पिनसारख्या टोकदार किंवा लोखंडी वस्तू मंगळसूत्राला लावणं टाळावं, असा सल्ला अभ्यासक देतात.