Mosquito Bites : डास नेहमी तुम्हालाच का चावतात? जाणून घ्या यामागचं विज्ञान

Published : Aug 08, 2026, 03:00 PM IST

तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की डास नेहमी तुम्हालाच का चावतात? डासांच्या आकर्षणामागील विज्ञान जाणून घ्या, ज्यात शरीरातील उष्णता, रक्तगट, घाम आणि इतर आश्चर्यकारक घटक सामील आहेत, जे काही लोकांना त्यांचे आवडते लक्ष्य बनवतात.

PREV
17
मच्छर का चावतात?
एका खोलीत चार-पाच जण असले तरी डास फक्त एकाच व्यक्तीला चावतात. आपण गंमतीने म्हणतो, 'माझं रक्त गोड असेल, म्हणून मला चावतात.' पण खरं तर याचा रक्ताच्या गोडपणाशी काहीही संबंध नाही! संशोधनानुसार, डास इतरांपेक्षा तुम्हाला का निवडतात, यामागे काही रंजक वैज्ञानिक कारणं आहेत. चला, ती काय आहेत ते जाणून घेऊया.
27
O ब्लड ग्रुपच्या व्यक्ती
डासांना आकर्षित करण्यात तुमचा रक्तगट मोठी भूमिका बजावतो. जपानमधील संशोधकांच्या मते, डास 'O' रक्तगटाच्या लोकांना इतर रक्तगटांच्या लोकांपेक्षा दुप्पट चावतात. आपली त्वचा काही रासायनिक संकेत बाहेर सोडते, ज्याद्वारे डास तुमचा रक्तगट ओळखू शकतात.
37
कार्बन डायऑक्ससाइड आहे कारणीभूत?
आपण श्वासावाटे जो कार्बन डायऑक्साइड (CO2) बाहेर टाकतो, तो डास जवळपास १०० फूट अंतरावरूनही ओळखू शकतात. त्यामुळे, जे लोक जास्त CO2 बाहेर टाकतात, ते डासांसाठी सोपं लक्ष्य बनतात. गर्भवती महिला आणि जास्त व्यायाम करणारे लोक इतरांपेक्षा जास्त CO2 बाहेर सोडतात, त्यामुळे त्यांना डास जास्त चावतात.
47
शरीराचा घाम
आपल्या घामामध्ये लॅक्टिक ॲसिड, अमोनिया आणि कार्बोजिलिक ॲसिडसारखी संयुगं असतात, ज्यांचा वास डासांना खूप आवडतो. जेव्हा आपल्या त्वचेवरील बॅक्टेरिया या घामात मिसळतात, तेव्हा एक विशिष्ट वास तयार होतो. तुमच्या त्वचेवर या ॲसिडचं प्रमाण जास्त असेल, तर डास तुम्हाला जास्त त्रास देतील.
57
गडद रंगांचे कपडे
डास फक्त वासावर अवलंबून राहत नाहीत, तर ते तुम्हाला शोधण्यासाठी त्यांच्या दृष्टीचाही वापर करतात. जर तुम्ही काळ्या किंवा गडद निळ्या रंगाचे कपडे घातले असतील, तर तुम्ही त्यांच्यासाठी सोपं लक्ष्य बनता. हलक्या रंगाच्या कपड्यांच्या तुलनेत गडद रंग डासांना जास्त आकर्षित करतात.
67
शरीराचे तापमान किंवा अल्कोहोलचे सेवन
ज्या लोकांच्या शरीराचं तापमान जास्त असतं किंवा ज्यांना खूप घाम येतो, त्यांना डास पटकन शोधून काढतात. अभ्यासात असंही दिसून आलं आहे की, जे लोक बिअर किंवा इतर प्रकारची दारू पितात, त्यांना डास जास्त चावतात. याचं कारण कदाचित असं असू शकतं की, दारूमुळे शरीराचं तापमान वाढतं आणि घामाचा वास बदलतो.
77
मच्छर चावण्यापासून कसा बचाव कराल?
काही सोप्या गोष्टी करून तुम्ही डास चावण्यापासून वाचू शकता. शरीर पूर्णपणे झाकतील असे हलक्या रंगाचे कपडे घाला. स्वतःला नेहमी स्वच्छ आणि कोरडं ठेवा. रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा चांगल्या रिपेलेंटचा वापर करणं उत्तम. लक्षात ठेवा, डास चावल्याने फक्त खाज येत नाही, तर डेंग्यू आणि मलेरियासारखे धोकादायक आजारही होऊ शकतात. त्यामुळे, नेहमी काळजी घेतलेली बरी.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories