Ayurveda Tips For Eating : टीव्ही, मोबाईल बघत जेवताय? मग हे नक्की वाचा...

Published : Oct 31, 2026, 03:44 PM IST

आयुर्वेद टिप्स: तुम्हालाही टीव्ही किंवा मोबाईल बघत जेवायची सवय आहे का? आयुर्वेदानुसार, तुम्ही कसं जेवता याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. निरोगी राहायचं असेल तर जेवताना या ७ सवयी नक्की पाळा.

PREV
18
टीव्ही बघत जेवणं आरोग्यासाठी धोकादायक!

आजकाल लोक फक्त पोट भरण्यासाठी जेवत नाहीत. काही जण ऑफिसचं काम करत डबा खातात, तर काही जण टीव्ही किंवा मोबाईल बघत जेवतात. अशा वेळी आपलं जेवणाकडे अजिबात लक्ष नसतं. आपण अन्न नीट चावून खायलाही विसरतो. पण आयुर्वेदानुसार, पौष्टिक अन्न खाणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते योग्य पद्धतीने खाणंही गरजेचं आहे. चला तर मग, जेवणाची योग्य पद्धत कोणती ते जाणून घेऊया.

28
शांत ठिकाणी बसून जेवा

आयुर्वेदानुसार, आपण नेहमी शांत आणि स्वच्छ ठिकाणी बसून जेवलं पाहिजे. जेवताना टीव्ही बघणं, मोबाईल वापरणं किंवा मोठ्याने बोलणं टाळा. या सवयींमुळे आपलं जेवणावरून लक्ष उडतं. प्रत्येक घास नीट चावून खाण्याचा प्रयत्न करा. अन्न खूप वेगाने गिळू नका किंवा जेवायला गरजेपेक्षा जास्त वेळही लावू नका.

38
खूप गरम किंवा थंड अन्न खाऊ नका

काहींना एकदम कडकडीत गरम जेवण आवडतं, तर काही जण थेट फ्रिजमधून काढलेलं थंड अन्न खातात. आयुर्वेदानुसार, अन्न खूप गरम किंवा खूप थंड नसावं. सामान्य तापमानावर असलेलं किंवा थोडं कोमट अन्न खाणं पचनासाठी सर्वात उत्तम मानलं जातं.

48
जेवणात सहा चवींचा समावेश करा

आयुर्वेदात सहा चवींना आहाराचा महत्त्वाचा भाग मानलं आहे. गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट या त्या सहा चवी आहेत. त्यामुळे तुमच्या ताटात वेगवेगळ्या चवींच्या पदार्थांचा समावेश करा. फळं, डाळी, भाज्या आणि सॅलड खाल्ल्याने आहारात विविधता टिकून राहते.

58
जेवणापूर्वी आणि नंतर लगेच पाणी पिऊ नका

जेवण्यापूर्वी थोडा वेळ किंवा जेवल्यानंतर लगेच भरपूर पाणी पिणं टाळा. आयुर्वेदानुसार, याचा पचनक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतो. जेवताना तहान लागल्यास तुम्ही थोडे थोडे घोट पाणी पिऊ शकता.

68
रात्रीचं जेवण हलकं असावं

दुपारच्या जेवणाच्या तुलनेत रात्रीचं जेवण नेहमी हलकं असावं. झोपण्याच्या किमान २-३ तास आधी रात्रीचं जेवण उरकण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीराला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो.

78
जेवणानंतर थोडं चाला

जेवल्या जेवल्या लगेच अंथरुणावर पडणं किंवा झोपणं टाळा. आयुर्वेदात रात्रीच्या जेवणानंतर थोडा वेळ चालण्याचा सल्ला दिला जातो. तुम्ही आरामात १०० पावलं चालू शकता, ज्याला आपण शतपावली म्हणतो.

88
जेवल्यानंतर लगेच जड कामं करू नका

जेवल्यानंतर लगेच जिममध्ये जाणं, जड वजन उचलणं किंवा कठीण शारीरिक कामं करणं अजिबात चांगलं नाही. जेवणानंतर शरीराला थोडी विश्रांती देणं अत्यंत गरजेचं आहे.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories