Divorce Survey: घटस्फोटानंतर लग्नाचे फोटो लोक काय करतात? एक्स-पार्टनरसोबतचे सगळे संबंध तोडणे खरंच गरजेचे असते का? घटस्फोटानंतर नवीन आयुष्याची सुरुवात करताना एक्स-पार्टनरसोबत कसे वागावे, यावर एका नव्या सर्व्हेमध्ये रंजक माहिती समोर आली आहे.
घटस्फोटानंतर जुन्या आठवणी पूर्णपणे पुसून टाकाव्या लागतात का? एक्स-पार्टनरसोबतचे सगळे संबंध तोडावे लागतात का? यावर नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेमध्ये रंजक माहिती समोर आली आहे. घटस्फोट घेतलेल्या १० पैकी ७ जण आजही त्यांच्या लग्नाचे फोटो जपून ठेवतात, असे या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे.
भारतातील मॅचमेकिंग ॲप 'Rebounce' ने हा सर्व्हे केला आहे. ३० ते ४० वयोगटातील आणि किमान दोन वर्षांपूर्वी घटस्फोट घेतलेल्या ९,२८३ लोकांनी यात सहभाग घेतला. एक्स-पार्टनरसोबतच्या मर्यादा, जुन्या आठवणी आणि नवीन नात्यात येणाऱ्या अडचणी यावर त्यांची मते जाणून घेण्यात आली.
24
संबंध पूर्णपणे तोडणे शक्य आहे का?
सर्व्हेनुसार, ३५ वर्षांवरील ४७ टक्के घटस्फोटितांनी सांगितले की, एक्स-पार्टनरसोबतचे संबंध पूर्णपणे तोडण्याचा विचार योग्य नाही. विशेषतः जेव्हा मुले असतात, तेव्हा एक्स-पार्टनरसोबतचे संबंध पूर्णपणे तोडणे शक्य नसते. सुमारे ३१ टक्के लोकांनी सांगितले की ते त्यांच्या एक्स-पार्टनरशी अधूनमधून बोलतात. मुलांचे शाळेतील कार्यक्रम, मालमत्ता किंवा कायदेशीर बाबी आणि कौटुंबिक संबंध ही यामागची मुख्य कारणे आहेत.
34
मुलांसाठी जपतात आठवणी
लग्नाच्या फोटोंचा विचार केल्यास, ७० टक्के लोकांनी सांगितले की त्यांनी आजही ते फोटो स्वतःजवळ ठेवले आहेत. मात्र, फोटो जपून ठेवणे म्हणजे जुने नाते पुढे चालू ठेवण्याची इच्छा आहे, असा याचा अर्थ होत नाही. विशेषतः मुले, कौटुंबिक आठवणी आणि एकत्र घालवलेल्या वर्षांची आठवण म्हणून लोक हे फोटो जपून ठेवतात, असे सर्व्हेत म्हटले आहे.
तसेच, ३० ते ४० वयोगटातील ३६ टक्के घटस्फोटितांनी सांगितले की, जुनी ठिकाणे, सण आणि आठवणींबद्दल त्यांच्या मनात आजही सकारात्मक भावना आहेत. पण, या गोष्टींचा त्यांच्या सध्याच्या नात्यावर कोणताही परिणाम होत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
घटस्फोटानंतर एक्स-पार्टनरसोबत कसे वागावे, यासाठी सर्वांना एकच नियम लागू होत नाही. मुले, कुटुंब, मालमत्ता आणि जुने नाते यांसारख्या परिस्थितीनुसार मर्यादा बदलत असतात. जुन्या नात्याचा नवीन नात्यावर परिणाम होऊ न देणे, हाच यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असल्याचे सर्व्हेत नमूद केले आहे.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.