Refrigerator Safety: फ्रिजमधून असे विचित्र आवाज येतायत? दुर्लक्ष केल्यास होऊ शकतो ब्लास्ट

Published : Oct 16, 2026, 01:06 PM IST

तुमच्या घरातील फ्रिजमधूनही अनेकदा विचित्र आवाज येतात का? ही छोटी समस्या समजून त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हा आवाज म्हणजे कॉम्प्रेसर ओव्हरहीट होऊन फ्रिजचा स्फोट होण्याचा डेंजर सिग्नल असू शकतो! तज्ज्ञांनी याबद्दल नेमका काय इशारा दिलाय?

PREV
15
छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो मोठा अनर्थ

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात फ्रिज हे एक अत्यंत महत्त्वाचे उपकरण असते. पण अनेकदा आपण फ्रिजमधून येणाऱ्या विचित्र आवाजांकडे दुर्लक्ष करतो. तज्ज्ञांच्या मते, आपला हाच निष्काळजीपणा फ्रिजच्या स्फोटाला कारणीभूत ठरू शकतो. मध्य प्रदेशात नुकतीच एक भयंकर घटना घडली. तिथे फ्रिजचा कॉम्प्रेसर फुटल्याने एका लहान मुलाच्या चेहऱ्याची तब्बल १०८ हाडे मोडली! त्यामुळे फ्रिजमधून येणारे कोणते आवाज धोकादायक असतात आणि त्याची लक्षणे काय आहेत, हे आपण समजून घेतले पाहिजे.

25
'धड-धड' आवाज आल्यास त्वरित सावध व्हा

कारण - फ्रिजच्या मागच्या बाजूला असलेल्या कॉम्प्रेसरमधून जर 'धड-धड' असा आवाज येत असेल किंवा फ्रिज जास्तच हालत असेल, तर ते कॉम्प्रेसर खराब होत असल्याचे लक्षण आहे. कॉम्प्रेसरचे स्क्रू सैल झाल्यावर किंवा आतील भाग तुटल्यावर असा आवाज येतो.
धोका - याकडे दुर्लक्ष केल्यास कॉम्प्रेसर जॅम होतो. यामुळे आत प्रचंड दाब निर्माण होऊन स्फोट होण्याची शक्यता असते.
उपाय - असा आवाज ऐकू येताच तुम्ही लगेच फ्रिज बंद करा आणि मेकॅनिकला बोलावून तपासून घ्या.

35
'क्लिक-क्लिक' आवाज आणि कूलिंग न होणे

कारण - तुम्ही फ्रिज चालू ठेवलाय पण तो थंड करत नाहीये आणि त्यातून सतत 'क्लिक... क्लिक...' असा आवाज येतोय, तर याचा अर्थ कॉम्प्रेसर ओव्हरहीट (खूप जास्त गरम) होत आहे.
उपाय - फ्रिजच्या मागील बाजूस असलेल्या कंडेन्सर कॉइलवर धूळ साचल्यास असा प्रकार घडतो. तुम्ही आधी ती धूळ साफ करा. तरीही आवाज येत राहिल्यास त्वरित सर्व्हिसिंग करून घ्या.

45
सतत येणारा विचित्र आवाज आणि बर्फ साचणे

कारण - फ्रिजच्या दरवाजाचे रबर सैल झाल्यावर आत हवा जाते. यामुळे फ्रीजरमध्ये खूप जास्त बर्फ साचतो (Ice blockage) आणि फॅन फिरताना विचित्र आवाज येऊ लागतो.
उपाय - तुम्ही काही काळासाठी फ्रिज बंद करा. दरवाजा उघडा ठेवून तो डीफ्रॉस्ट करा (बर्फ वितळू द्या). त्यानंतर दरवाजा व्यवस्थित बंद करा.

55
जीवघेणा धोका टाळण्यासाठी घ्या ही काळजी

वेळोवेळी सर्व्हिसिंग - तुम्ही वर्षातून किमान एकदा तरी अधिकृत तंत्रज्ञाकडून फ्रिजची सर्व्हिसिंग करून घ्या.
हवा खेळती राहू द्या - फ्रिज भिंतीला अगदी चिकटून ठेवू नका. मागच्या बाजूने उष्णता बाहेर जाण्यासाठी भिंत आणि फ्रिजमध्ये किमान ६ इंचांचे अंतर ठेवा.
सतत आवाज आल्यास बंद करा - फ्रिज न थांबता सतत आणि खूप जोरात आवाज करत असेल, तर तुम्ही लगेच त्याचे बटण बंद करा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories