AI Caricature Trend : तुमचा एक फोटो आणि... मोठा सायबर धोका? राहा सावधान!

Published : Mar 08, 2026, 10:58 AM IST
Viral AI Caricature Trend Poses Major Cybersecurity Risks

सार

Viral AI Caricature Trend Poses Major Cybersecurity Risks : सोशल मीडियावर सध्या AI कॅरिकेचरचा ट्रेंड जोरात आहे. पण हा ट्रेंड तुमच्यासाठी मोठा सायबर धोका ठरू शकतो. तुमची वैयक्तिक माहिती आणि फोटो वापरून डिजिटल फसवणूक होण्याची शक्यता आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

Viral AI Caricature Trend Poses Major Cybersecurity Risks : सध्या सोशल मीडियावर एक नवीन ट्रेंड व्हायरल झालाय, जो बघायला तर भारी वाटतोय, पण सायबर सुरक्षा तज्ज्ञांची झोप उडवणारा आहे. यात युजर्स स्वतःचे फोटो AI टूल्सना देऊन 'माझ्याबद्दल तुला जे काही माहित आहे' (everything you know about me) या आधारावर एक कॅरिकेचर किंवा ॲनिमेटेड चित्र बनवायला सांगत आहेत. ऑफिसमध्ये काम करताना, कुटुंबासोबत किंवा तुमच्या कामाचं स्वरूप दाखवणारी ही चित्रं इन्स्टाग्राम, फेसबुक, लिंक्डइन आणि एक्स (पूर्वीचं ट्विटर) यांसारख्या प्लॅटफॉर्मवर खूप शेअर होत आहेत.

व्हायरल कॅरिकेचर ट्रेंडमधील धोका

पण हा ट्रेंड वाटतो तितका साधा नाही. यात तुमची वैयक्तिक माहिती लीक होऊन डिजिटल फसवणुकीला आमंत्रण मिळू शकतं, असा इशारा सायबर सुरक्षा तज्ज्ञ देत आहेत. कॅस्परस्की (Kaspersky) कंपनीचे आशिया पॅसिफिक विभागाचे व्यवस्थापकीय संचालक ॲड्रियन हिया (Adrian Hia) सांगतात की, हे AI प्रॉम्प्ट्स साध्या फोटो फिल्टरसारखे काम करत नाहीत. अधिक अचूक चित्र बनवण्यासाठी युजर्स त्यांच्या प्रोफाइलशी संबंधित बरीच माहिती AI ला पुरवतात.

एका फोटोमधून तुमचा चेहरा, अंदाजे वय, वंश आणि बॅकग्राउंडमुळे तुमचं घर किंवा ऑफिस याबद्दल माहिती मिळू शकते. यासोबतच तुमचं नाव, नोकरी, कंपनी, शहर, छंद आणि कुटुंबातील सदस्यांची माहिती जोडली, की AI तुमची एक संपूर्ण डिजिटल प्रोफाइलच तयार करू शकतं.

ही माहिती सायबर गुन्हेगारांसाठी एक मोठी संधी ठरू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तुमचा फोटो आणि कामाची माहिती मिळाल्यास, ते बनावट सोशल मीडिया प्रोफाइल तयार करू शकतात किंवा तुमच्या कंपनीतील सहकाऱ्यांना खोटे ई-मेल पाठवू शकतात. काहीवेळा कुटुंबातील सदस्यांना टार्गेट करून 'अपघात झाला आहे' असे तातडीचे मेसेज पाठवून पैशांची मागणी केली जाऊ शकते.

याशिवाय, तुम्ही AI सेवा वापरता तेव्हा तुमचा फोटो, तुम्ही दिलेले कमांड्स (टेक्स्ट प्रॉम्प्ट्स), वापराची हिस्ट्री, आयपी ॲड्रेस आणि डिव्हाइसची माहितीही काही प्लॅटफॉर्म्स सेव्ह करून ठेवू शकतात. हा डेटा नंतर त्यांची सेवा सुधारण्यासाठी किंवा AI ला ट्रेनिंग देण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

त्यामुळे अशा ट्रेंडमध्ये सहभागी होताना कमीत कमी वैयक्तिक माहिती शेअर करा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. कंपनीचा लोगो, आयडी कार्ड, पत्ता किंवा तुमचं नेमकं ठिकाण दाखवणारे फोटो अपलोड करणं टाळा. तसंच, "माझ्याबद्दल तुला जे काही माहित आहे” (“everything you know about me”) सारख्या कमांड्स AI ला देणंही टाळा. डिजिटल जग झपाट्याने बदलत असताना, सायबर सुरक्षेबद्दल जागरूक राहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण गंमत म्हणून सुरू झालेला छोटा ट्रेंडही कधीकधी मोठ्या धोक्याचं कारण ठरू शकतो.

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Navratri 2026 Fashion: जुन्या कपड्यांना द्या नवा लूक, नवरात्रीसाठी ९ भन्नाट आयडिया!
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स