
Visa Free Countries for Indians 2025 : एकेकाळी स्वप्नवत वाटणारा विमानप्रवास आता सहज साध्य झाला आहे. विमानप्रवाशांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. बऱ्यापैकी आवाक्यात असलेले विमानाचे तिकीट आणि वेळेची बचत या दोन कारणास्तव लोक विमानाने प्रवास करणे पसंत कतात. केवळ देशांतर्गतच नव्हे तर, परदेशात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यात व्हिसाशिवाय काही देशांना भेट देणे शक्य आहे. मात्र, 2024च्या तुलनेत अशा देशांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे.
परदेशात फिरण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय प्रवाशांना 2025 मध्ये 57 देशांमध्ये फिरण्याची उत्तम संधी लाभली. Henley Passport Index 2025 नुसार, भारतीय पासपोर्टची रँकिंग यावर्षी 5 स्थानांनी घसरून 85 व्या क्रमांकावर आली आहे. आता भारतीय नागरिक 57 देशांमध्ये व्हिसाशिवाय किंवा व्हिसा ऑन अरायव्हलवर प्रवास करू शकतात. गेल्या वर्षी 2024 मध्ये भारत 80 व्या स्थानावर होता आणि तेव्हा 62 देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवेश मिळत होता. भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम रँकिंगबद्दल बोलायचे झाल्यास, ती 2006 मध्ये 71 वी होती.
Henley Passport Index ही जगातील एक प्रमुख ग्लोबल पासपोर्ट रँकिंग प्रणाली आहे. एखाद्या देशाच्या पासपोर्टवर किती देशांमध्ये आधी व्हिसा घेतल्याशिवाय प्रवेश केला जाऊ शकतो, हे ती दर्शवते. हा निर्देशांक International Air Transport Associationच्या (IATA) डेटावर आधारित आहे आणि Henley & Partners द्वारे दर महिन्याला तो अपडेट केला जातो. 2025 च्या रँकिंगमध्ये 199 पासपोर्ट आणि 227 देश/डेस्टिनेशन्सची तुलना केली गेली.