साखर खाणं बंद केल्यामुळे चेहऱ्यावर चमक येते का? नैसर्गिकरित्या सौंदर्य वाढतं का? यातलं सत्य काय आहे, हे डॉक्टर सांगत आहेत. आहारातून साखर वगळल्यास शरीरात काय बदल होतात, ते जाणून घ्या.
स्वीट्स, कोल्ड्रिंक्स, चॉकलेट्स अशा अनेक पदार्थांमधून साखर आपल्या आहारात येते. गोड चवीमुळे अनेकजण रोजच साखरेचे पदार्थ खातात. पण डॉक्टरांच्या मते, तुम्ही आहारातून साखर काढून टाकल्यास तुमचा चेहरा अधिक सुंदर आणि चमकदार होऊ शकतो. जेव्हा तुम्ही जास्त साखर आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्स खाता, तेव्हा शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते. यामुळे शरीर जास्त पाणी आणि सोडियम साठवून ठेवते. साखर सोडल्यावर हे अनावश्यक पाणी शरीरातून बाहेर पडतं आणि चेहऱ्यावरची सूज कमी होते. जास्त साखर रक्तातील प्रोटीन्ससोबत मिळून 'ग्लायकेशन' (Glycation) नावाची प्रक्रिया सुरू करते. यामुळे त्वचेला लवचिक ठेवणाऱ्या 'कोलेजन' (Collagen) आणि 'इलास्टिन' (Elastin) या प्रोटीन्सना नुकसान पोहोचतं. साखर सोडल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत आणि चेहरा तरुण दिसतो.
23
साखरेचे सेवन केल्याने होणारे नुकसान
साखरेमुळे शरीरात दाह (inflammation) वाढतो. यामुळे चेहऱ्यावर लालसरपणा, मुरुमं आणि पुरळ येऊ शकतात. जेव्हा तुम्ही साखर खाणं बंद करता, तेव्हा त्वचेवरील हा दाह नियंत्रणात येतो. यामुळे चेहरा स्वच्छ आणि निरोगी दिसतो. आपण गोड पदार्थ जास्त खाल्ल्यावर इन्सुलिनची पातळी झपाट्याने वाढते. यामुळे शरीरात चरबी जमा व्हायला लागते. साखर सोडल्यामुळे इन्सुलिनची पातळी स्थिर राहते. परिणामी, चेहरा आणि शरीरात अनावश्यक चरबी जमा होणं थांबतं.
33
साखर बंद केल्यास होणारे सकारात्मक परिणाम
फक्त चेहऱ्यावरची चरबी कमी करणं (Spot Reduction) शक्य नसतं. पण, जेव्हा तुम्ही साखर सोडता, तेव्हा संपूर्ण शरीराचं वजन आणि चरबी कमी होऊ लागते. याचा परिणाम म्हणून, चेहऱ्यावरची चरबीही कमी होते आणि चेहरा सडपातळ व आकर्षक (Slim & Sculpted) दिसू लागतो. चेहरा सडपातळ दिसण्यासाठी साखर सोडणं हा एक चांगला उपाय असला तरी, तो एकमेव उपाय नाही. पुरेसं पाणी पिणं, पुरेशी झोप घेणं, पौष्टिक आहार आणि व्यायाम करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींसोबत साखर कमी केल्यास कायमस्वरूपी आणि आरोग्यदायी बदल दिसतात, असं डॉक्टर सांगतात.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.