Stylish and Comfortable Footwear for Women Over 40 : चाळीशीनंतर महिलांनी स्टाईलसोबतच कम्फर्टेबल फुटवेअर घालण्यावर भर दिला पाहिजे. या वयात तुमच्या वॉर्डरोबमध्ये काही खास बदल करायला हवेत. आम्ही तुम्हाला अशा 7 प्रकारच्या फुटवेअरबद्दल सांगणार आहोत.
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी लोफर्स (Loafers) हा एक उत्तम पर्याय आहे. हे पूर्णपणे फ्लॅट असतात आणि पायांना चांगला सपोर्ट देतात. तुम्ही हे जीन्स किंवा फॉर्मल कपड्यांवर सहज घालू शकता. दुसरीकडे, ऑफिसमध्ये प्रोफेशनल आणि एलिगेंट लूकसाठी किटन हीलवाले पंप्स (Pumps) छान दिसतात. यांची हील लहान असल्यामुळे दिवसभर घातल्यावरही पाय जास्त दुखत नाहीत.
24
मेरी जेन शूजच्या (Mary Janes) वरच्या बाजूला एक स्ट्रॅप असतो, ज्यामुळे पायांना चांगली ग्रीप मिळते. हे शूज हील्स आणि फ्लॅट अशा दोन्ही प्रकारांमध्ये मिळतात. स्टाईलसोबत आराम हवा असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. तुम्हाला हील्स घालायला आवडत असतील पण दुखण्याची भीती वाटत असेल, तर प्लॅटफॉर्म हील्स तुमच्यासाठी योग्य आहेत. यांचा बेस रुंद असल्यामुळे शरीराचं वजन पूर्ण पायावर सारखं विभागलं जातं आणि वेदना कमी होतात.
34
ज्या महिलांना बारीक हील्स घालून बॅलन्स करणं अवघड वाटतं, त्यांच्यासाठी वेज हील्स (Wedge Heels) एक भारी ऑप्शन आहे. या रोजच्या वापरासाठी आणि पार्टीसाठी, दोन्ही वेळेस ग्रेसफुल लूक देतात. याशिवाय, तुम्ही ब्रॉड ब्लॉक हील्सही निवडू शकता. या दिसायला स्टायलिश असतात आणि चालताना पायांना चांगला बॅलन्सही देतात.
लग्न किंवा सणांच्या दिवशी हेवी हील्सऐवजी एम्ब्रॉयडरी केलेली जुत्ती किंवा मोजडी घालणं जास्त सोयीचं ठरतं. जर तुम्ही इंडो-वेस्टर्न आऊटफिट घालणार असाल, तर स्टायलिश म्यूल्स (Mules) सुद्धा एक चांगला पर्याय आहे. बाजारात तुम्हाला कमी किमतीत छान मोजडी आणि म्यूल्स मिळतील.