मुंबई - गरुड पुराणात पुरुष आणि महिलांसाठी अनेक नियम सांगितले आहेत. हे नियम पाळले तर आयुष्यात सुख-शांती नांदते. पण काही गोष्टी महिलांनी करूच नयेत असं म्हटलं आहे. त्याच्या मागे काही धार्मिक गोष्टी आहेत. त्यांबद्दल जाणून घेऊयात.
गरुड पुराणाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. हे सहसा एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर वाचले जाते. त्यामुळे याबाबत अत्यंत संवेदनशिलता बाळगली जाते. गरुड पुराणात महिलांनी काही कामे करू नयेत असं सांगितलंय. त्याचा त्यांच्यावर कसा परिणाम होतो ते जाणून घेऊया.
25
नवऱ्यापासून दूर राहू नये
गारुड पुराणानुसार, कोणत्याही कारणाशिवाय बराच काळ नवऱ्यापासून दूर राहणाऱ्या महिलेला कुटुंब आणि समाजात मान मिळत नाही. यामुळे तुमचा जोडीदारही मानसिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकतो. त्यामुळे, महिलांनी कोणत्याही कारणाशिवाय आपल्या नवऱ्यापासून दूर राहू नये. तसेच दूरावा ठेवू नये. जास्त काळ दुरावा ठेवला तर नाते संपुष्टात येण्याच्या दिशेने प्रवास सुरु होतो.
35
वाईट स्वभावाच्या लोकांपासून दूर राहावे
शास्त्रानुसार, व्यक्ती स्त्री असो वा पुरुष, त्याने नेहमी आपला स्वभाव शुद्ध ठेवावा. वाईट स्वभावाच्या लोकांपासूनही दूर राहावे. विशेषतः महिलांनी याची विशेष काळजी घ्यावी. गरुड पुराणानुसार, महिलांनी वाईट स्वभावाच्या लोकांपासून दूर राहावे कारण अशा लोकांची संगत तुमच्या आयुष्यावरही वाईट परिणाम करते.
गरुड पुराणानुसार, महिलांनी कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्याच्या घरी जाऊन तिथे राहू नये. काहीही समस्या असली तरी, स्वतःच्या घरी राहून ती सोडवणे चांगले, कारण असं केल्याने तुमच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढू शकतात. त्यामुळे असे चुकूनही करु नये. अन्यथा समस्या उद्भवू शकतात.
55
कुटुंबातील सदस्यांना कधीही अपमानित करू नये
गरुड पुराणानुसार, महिलांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना कधीही अपमानित करू नये. तुम्ही तुमच्या कुटुंबाला अपमानित केल्यास, तुम्हाला समाजात मान मिळणार नाही. कुटुंबातील सदस्यांसोबत काही समस्या असल्यास, त्यांना अपमानित करण्याऐवजी त्यांच्याशी बसून बोला. बोलल्याने ९० टक्के समस्या सोडविता येऊ शकतात.