मुंबई - भगवान महादेवाच्या दागिन्यांना खूप महत्त्व आहे. त्याच्या प्रत्येक दागिन्याचा अर्थ उपजीविकेशी निगडीत आहे. शंकराच्या दागिन्यांचे वेगळे महत्त्व आणि ते घरात ठेवल्याने काय फायदे होतात ते जाणून घ्या…
हिंदू धर्मात शंकराच्या दागिन्यांना खूप महत्त्व आहे. शंकराचे दागिने घरात ठेवल्याने फायदे तर होतातच, पण त्याचा आशीर्वादही मिळतो, असे सांगितले जातात. त्यामुळे महादेवाच्या दागिन्यांना मोठी मागणी असते.
26
शंकरासोबत असलेल्या बैलाला नंदी म्हणतात. नंदी महाराजांवर स्वार होणारा शंकर म्हणजे शंकर नेहमी धर्मावर स्वार असतो. घरात नंदीची छोटी मूर्ती ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा कधीच घरात येत नाही. नदी नकारात्मक उर्जेला दूर पळवतो, असे म्हटले जाते.
36
चंद्र हा मन आणि शीतलतेशी संबंधित आहे. चंद्र शंकराच्या डोक्यावर विराजमान आहे. शंकराच्या डोक्यावर असलेल्या चंद्राचा अर्थ मनाला कधीही तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका, कारण मन चंचल असते. त्यामुळे धातूचा चंद्र घरात ठेवल्याने मन शांत आणि आनंदी राहते.
शंकराच्या दागिन्यांमध्ये त्याचा डमरूही खूप महत्त्वाचा आहे. डमरू विश्वाचे प्रतीक आहे. डमरू घरात ठेवल्याने गोष्टी नेहमी नियंत्रणात राहतात. तसेच डमरुचा आवाज घरात नवचौतन्य निर्माण करतो. पण घरात ठेवताना तो कायम देवघराच्या शेजारी ठेवा.
56
शंकराचा त्रिशूळ सत्व, रज आणि तम या तीन गुणांचे प्रतीक आहे. शंकराचा हा दागिना या तीनही गुणांवर शंकराचे नियंत्रण आहे हे दर्शवतो. घरात त्रिशूळ ठेवल्याने मन, मेंदू आणि शरीर चैतन्यशील राहते.
66
शंकराच्या दागिन्यांमध्ये नागही आहे. नाग हा सावधगिरी आणि जागरूकतेचे प्रतीक आहे. नाग धारण करून शंकर नेहमी जागरूक असल्याचा संदेश देतो. घरात नागाची मूर्ती ठेवल्याने शत्रूंपासून सुटका मिळते.