महानगरांसह परदेशातही मुलं तर काय, मुलीही वन नाईट स्टँड लाईफस्टाईलकडे आकर्षित होत आहेत. मुलीही या ट्रेन्डसाठी पुढाकार घेताना दिसून येत आहेत. म्हणजेच पहिल्यांदाच मुली त्यांच्या शारीरिक गरजांबाबत खुलेपणाने बोलत असल्याचे दिसून येत आहे. रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्रातही वन नाईट स्टँड लाईफस्टाईल सुरू झाली आहे असं म्हटलं जात आहे. पण ही लाईफस्टाईल फक्त महानगरांपुरतीच मर्यादित आहे.