
Sitaphal Basundi Recipe: सीताफळाची नैसर्गिक गोडी आणि दुधाची श्रीमंती एकत्र आली की तयार होते अप्रतिम सीताफळ बासुंदी. सण, वाढदिवस किंवा घरी खास पाहुणचार या डेझर्टची चव प्रत्येकाला भावते. चला तर मग जाणून घेऊया ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी.
1 लिटर फुल फॅट दूध
½ ते ⅔ कप साखर (आपल्या चवीप्रमाणे)
3–4 पिकलेली, गोड सीताफळे
5–6 वेलदोडे (पावडर)
8–10 बदाम, बारीक चिरलेले – ऐच्छिक
8–10 पिस्ते – ऐच्छिक
1. दूध घट्ट करणे
कढईत दूध घ्या आणि मध्यम आचेवर उकळायला ठेवा.
दूध अर्धे होईपर्यंत उकळत राहा.
मध्ये मध्ये ढवळत राहणे आवश्यक, अन्यथा दूध खाली लागू शकते.
2. साखर आणि वेलदोड्याचा सुगंध
दूध छान घट्ट झाल्यावर त्यात साखर घाला.
वेलदोड्याची पावडर मिसळून 5–7 मिनिटे उकळा.
गॅस बंद करा आणि बासुंदी पूर्णपणे थंड होऊ द्या.
(महत्त्वाचे: गरम बासुंदीत सीताफळ घातल्यास दूध फाटते!)
3. सीताफळाचा गर मिक्स करणे
सीताफळे उघडून गर हळूवारपणे काढा आणि बिया वेगळ्या करा.
बासुंदी पूर्ण थंड झाल्यावर सीताफळाचा गर हलक्या हाताने मिसळा.
सर्व्ह करताना वरून बदाम–पिस्ता टाका.
पूर्ण थंड किंवा हलक्या गार अवस्थेत सीताफळ बासुंदी अप्रतिम लागते.
कधीही गरम बासुंदीत सीताफळ घालू नये.
बासुंदी जास्त पातळ हवी असेल तर थोडेसे थंड दूध घालून consistency समायोजित करा.
मुलांसाठी कमी साखर वापरली तरी सीताफळामुळे गोडी उत्तम येते.