
अनेकदा आपल्या निष्काळजीपणाचा परिणाम लगेच नाही तर, कालांतराने दिसू लागतात. विशेषत: शारीरिक व्याधीबाबत असेच काहीसे घडते. वेळीच उपाय करायचे सोडून, ‘होईल बरं’ असे म्हणत आपण दिवस ढकलत चालले असतो. पण भविष्यात ती एक मोठी समस्या बनू शकते. विशेष म्हणजे, काही गोष्टी प्रथमोपचार किंवा साध्या, सोप्या घरगुती उपायांनी देखील बऱ्या होऊ शकतात. पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. रक्ताच्या गुठळीबाबतही तसेच काहीसे होते.
आपल्या शरीरात कुठेही मार लागल्यास, तिथे रक्त गोठून रक्ताची गुठळी तयार होते. दोन-तीन दिवसांनंतर ती जागा काळी पडते. याकडे सुरुवातीलाच लक्ष न दिल्यास भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे, रक्ताची गुठळी बरी करण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. ते कोणते, हे या लेखात पाहूया.
रक्ताची गुठळी बरी करणारे घरगुती उपाय:
1. चिंच आणि खडे मीठ…
स्वयंपाकात वापरली जाणारी चिंच रक्ताची गुठळी बरी करण्यास मदत करते. यासाठी थोडी चिंच आणि थोडे खडे मीठ एकत्र करून चांगले मिसळा आणि रक्ताची गुठळी असलेल्या ठिकाणी लेप लावा. यामुळे हळूहळू आराम मिळेल.
2. हळद
रक्ताची गुठळी बरी करण्यासाठी, थोड्याशा कोमट पाण्यात हळद मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट गुठळीच्या जागी लावून पट्टी बांधा. रोज असे केल्याने रक्ताची गुठळी लवकर बरी होईल.
3. एरंड आणि निर्गुडी
यासाठी एरंड आणि निर्गुडीची पाने एरंडेल तेलात परतून घ्या. नंतर ही पाने एका पांढऱ्या कापडात बांधून रक्ताची गुठळी झालेल्या ठिकाणी शेक द्या. यामुळे रक्ताची गुठळी बरी होण्यास मदत होईल.
4. अश्वगंधा चूर्ण
हे आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळते. हे चूर्ण कोमट दुधात मिसळून रोज प्यायल्याने रक्ताची गुठळी पातळ होण्यास मदत होते.
5. रक्त बोळ
हे आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात मिळेल. ते पाण्यात मिसळून तयार झालेले मिश्रण बाधित भागावर लावल्यास रक्ताची गुठळी कमी होते.
6. काळे जिरे
पाव चमचा काळ्या जिऱ्याची पूड एका कापडात बांधून तांदळाच्या पेजेत शिजवून प्यायल्यास रक्ताची गुठळी बरी होण्यास मदत होते.
7. काकडी
रोज काकडीचा एक तुकडा रक्ताची गुठळी झालेल्या ठिकाणी ठेवल्यास ती लवकर बरी होते.