For skiing lovers : भारतात ही 5 ठिकाणे आहेत प्रसिद्ध, एकदा जाऊन पाहा

Published : Dec 19, 2025, 12:22 PM IST
Skiing

सार

Skiing in India : भारतात स्कीइंगची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. योग्य हवामान आणि योग्य ठिकाण निवडून तुम्ही इथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्कीइंगचा अनुभव घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया भारतातील त्या ठिकाणांबद्दल जिथे तुम्ही स्कीइंगचा आनंद घेऊ शकता.

Skiing Places In India : हिवाळा सुरू झाला की, अनेकांचे पर्यटनाला जाण्याचे बेत आखले जातात. भारताला एकीकडे विस्तीर्ण अशी किनारपट्टी लाभलेली आहे, तर, उत्तरेकडे हिमवृष्टीचा आनंद घेता येतो. त्यामुळे पर्यटनाचा बेत आखताना दक्षिण असो की पूर्व कुठेही जाऊन आनंद लुटता येतो. त्यात स्कीइंगची आवड असेल तर, त्यासाठीही देखील उत्तम ठिकाणे भारतात आहेत. तिथे डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग पाहतानाच हिमवृष्टीचाही आनंद घेऊ शकता.

तुम्ही ॲडव्हेंचरप्रेमी असाल आणि स्कीइंग करायला आवडत असेल, तर हिवाळ्यात ही ठिकाणे तुमच्यासाठी परफेक्ट आहेत. तुम्हाला बर्फाच्छादित पर्वत, थंडगार हवा आणि स्कीइंग आवडत असेल, तर हा तुमच्यासाठी एक उत्तम विंटर स्पोर्ट आहे. भारतातही अशी अनेक उत्तम ठिकाणे आहेत, जिथे दरवर्षी देश-विदेशातून पर्यटक स्कीइंगचा आनंद घेण्यासाठी येतात. योग्य हवामान, व्यावसायिक प्रशिक्षण आणि सुंदर दृश्यांसह ही ठिकाणे स्कीइंग प्रेमींसाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहेत.

1. गुलमर्ग, जम्मू-काश्मीर

गुलमर्गला भारताची Skiing Capital म्हटले जाते. येथील बर्फ खूप मऊ असतो, जो स्कीइंगसाठी परफेक्ट मानला जातो. गुलमर्ग गोंडोला आशियातील सर्वात उंच केबल कारपैकी एक आहे. जानेवारी ते मार्च हा काळ येथे स्कीइंगसाठी सर्वोत्तम असतो.

2. औली, उत्तराखंड

औली नवशिक्या आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या स्कीअर्ससाठी एक उत्तम ठिकाण आहे. येथील उतार चांगल्या प्रकारे मेन्टेन केलेले असतात आणि भारतीय स्कीइंग युनिटद्वारे प्रशिक्षणही दिले जाते. नंदा देवीचे सुंदर दृश्य औलीला आणखी खास बनवते.

3. सोलंग व्हॅली, हिमाचल प्रदेश

मनालीजवळील सोलंग व्हॅली ॲडव्हेंचरप्रेमींमध्ये प्रसिद्ध ठिकाण आहे. हिवाळ्यात येथे स्कीइंगसोबत स्नोबोर्डिंगचाही आनंद घेता येतो. हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि पहिल्यांदा स्कीइंग करणाऱ्यांसाठी उत्तम आहे.

4. कुफरी, हिमाचल प्रदेश

शिमल्याजवळ असलेले कुफरी स्कीइंगसाठी एक सोपा आणि किफायतशीर पर्याय आहे. येथे स्थानिक प्रशिक्षक आणि बेसिक स्कीइंग कोर्स उपलब्ध आहेत. कमी उंचीमुळे हे ठिकाण नवशिक्यांसाठी सुरक्षित मानले जाते.

5. पहलगाम, जम्मू-काश्मीर

पहलगाम नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. येथील बर्फाळ उतार स्कीइंगसाठी सर्वोत्तम आहेत, विशेषतः अशा लोकांसाठी ज्यांना गर्दीपासून दूर ॲडव्हेंचर हवे आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

OnePlus 15R की Pixel 9a यामधील बेस्ट स्मार्टफोन कोणता? वाचा फीचर्ससह अधिक माहिती
Parenting Tips : मुलांवर प्रेम करुनही कधीकधी त्यांना एकटे का वाटते? वाचा ५ कारणे