नवीन कपडे खरेदी न करता, तुमच्या वॉर्डरोबमधील जुन्या साड्या, ड्रेस आणि टॉप्सनाच स्टायलिश लूक देता येतो. कमी खर्चात फॅशनेबल दिसण्यासाठी काही सोप्या फॅशन हॅक्स आणि स्टायलिंग टिप्स जाणून घेऊया.
स्टायलिश दिसण्यासाठी खूप पैसे खर्च करून नवीन कपडे खरेदी करण्याची गरज नाही. आपल्याकडे असलेल्या साध्या कपड्यांनाही काही सोप्या फॅशन हॅक्स वापरून ट्रेंडी बनवता येतं. रोज ऑफिस, कॉलेजला जाणाऱ्या किंवा मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर जाणाऱ्या मुलींसाठी या टिप्स खूप उपयुक्त आहेत.
28
एकाच साडीसोबत वेगवेगळे ब्लाउज
एकाच साडीवर प्रत्येक वेळी तोच ब्लाउज घालण्याऐवजी प्लेन, प्रिंटेड, एम्ब्रॉयडरी किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज घालून बघा, तुम्हाला एक नवीन लूक मिळेल. त्याचप्रमाणे, शर्ट किंवा टी-शर्ट पूर्ण टक करण्याऐवजी फक्त पुढच्या बाजूला हाफ-टक केल्यास तुमच्या आऊटफिटला लगेच स्टायलिश लूक येतो.
38
साडीवर बेल्ट वापरून बघा
साध्या साडीला मॉडर्न टच द्यायचा असेल, तर साडीवर एक स्लिम बेल्ट लावून बघा. विशेषतः पार्टी किंवा कॅज्युअल कार्यक्रमांसाठी हा एक स्टायलिश लूक देतो. पण बेल्टचा रंग आणि डिझाइन साडीला जुळतंय की नाही हे नक्की तपासा. तसेच, सैल ड्रेस किंवा ओव्हरसाइज शर्टवर बेल्ट लावल्यास कंबर हायलाइट होते आणि आऊटफिटला चांगला शेप मिळतो.
साडी नेसण्याची पद्धत बदलल्यास तुमचा संपूर्ण लूक बदलू शकतो. नेहमीच्या प्लेटेड पदराऐवजी ओपन पदर ट्राय करा. खांद्यावर व्यवस्थित पिन लावल्यास एक 'नीट लूक' येतो. टी-शर्टवर ओपन शर्ट, डेनिम जॅकेट किंवा लाईट जॅकेट घालणे ही एक सोपी स्टायलिंग ट्रिक आहे. यामुळे एकच ड्रेस अनेक प्रकारे घालता येतो.
58
दुपट्ट्यामध्ये स्टाईल करू शकता
साध्या ब्लाउजसाठी पफ स्लीव्ह, एल्बो स्लीव्ह किंवा फुल स्लीव्ह यांसारख्या स्टाइल्स ट्राय करू शकता. साध्या ड्रेसवरही फक्त दुपट्टा घेण्याची पद्धत बदलली की लूक बदलतो. गळ्याभोवती घेण्याऐवजी एका बाजूला ड्रेप करून बघा.
68
अॅक्सेसरीजची योग्य निवड करा
साधी साडी किंवा ड्रेसवर दागिने (Jewellery) हा एक महत्त्वाचा स्टायलिंग घटक आहे. नेकलेस, कानातले, ब्रेसलेट किंवा घड्याळ यांसारख्या अॅक्सेसरीज साध्या कपड्यांनाही एक खास लूक देतात. पण खूप जास्त दागिने घालणं टाळा. आऊटफिटला साजेसे एक किंवा दोनच दागिने निवडा. प्लेन ड्रेसवर कॉन्ट्रास्ट रंगाच्या अॅक्सेसरीज वापरू शकता.
78
हेअरस्टाईल बदलून बघा
फक्त कपडेच तुमचा स्टायलिश लूक ठरवत नाहीत. एकाच साडी किंवा ड्रेसवर प्रत्येक वेळी तीच हेअरस्टाईल करण्याची गरज नाही. पोनीटेल, बन, मोकळे केस किंवा साधी हेअर अॅक्सेसरी वापरून बघा. साडीवर मोकळे केस, लो बन, पोनीटेल किंवा वेणी छान दिसते. ड्रेसवर मोकळे केस किंवा सिंपल पोनीटेल कॅज्युअल लुकसाठी परफेक्ट आहे.
88
आऊटफिटनुसार फुटवेअर निवडा
अनेकजण फक्त कपड्यांना महत्त्व देतात आणि फुटवेअरकडे दुर्लक्ष करतात. पण फुटवेअर तुमचा संपूर्ण लूक बदलू शकते. एकाच ड्रेससोबत स्नीकर्स, फ्लॅट्स, सँडल्स किंवा हील्स घातल्यास पूर्ण लूक बदलतो. त्याचप्रमाणे, साध्या ड्रेस किंवा साडीवर एक छानशी हँडबॅग किंवा क्लच घेतल्यास लूक आणखी पूर्ण होतो.
थोडक्यात काय तर… स्टायलिश दिसण्यासाठी नेहमी महागडे कपडे खरेदी करण्याची गरज नाही. एकच साडी किंवा ड्रेस वेगवेगळ्या ब्लाउज, दुपट्टा, दागिने, फुटवेअर आणि हेअरस्टाईलसोबत घालून तुम्ही वेगवेगळे लूक्स तयार करू शकता. फॅशन म्हणजे तुमची सोय, शरीरयष्टी, वय, प्रसंग आणि आवडीनुसार स्टाईल निवडणं.
टीप - या केवळ सामान्य फॅशन कल्पना आणि स्टायलिंग टिप्स आहेत. येथे कोणत्याही फॅशन डिझायनरचा संदर्भ दिलेला नाही.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.