Published : Jul 25, 2025, 07:24 AM ISTUpdated : Jul 25, 2025, 07:43 AM IST
मुंबई - प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस तुमचा कसा जाईल ते पाहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण. तुमच्या अंकानुसार जाणून घ्या तुमची आजचे भविष्य.
अंक १ (कोणत्याही महिन्यात १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेली व्यक्ती)
गणेश म्हणतात, मीडिया संबंधित माहिती येईल. तुमचे नाव चांगल्या अर्थाने लोकांसमोर येईल. याचा तुम्हाला अभिमान वाटेल. आज तुम्हाला आत्मविश्वास वाटेल. आज पती-पत्नीचे नाते सुखी राहील. कौटुंबीक सुख लाभेल. आज व्यवसायात प्रगती होईल. हातात अतिरिक्त पैसे पडतील. आज तुम्हाला छोट्या-मोठ्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. प्रकृतीची काळजी घ्या. आज व्यवसायात संघर्ष होऊ शकतो.
29
अंक २ (कोणत्याही महिन्यात २, ११, २० आणि २९ तारखेला जन्मलेली व्यक्ती)
गणेश म्हणतात, महिलांना घरातील कामात रस असेल. आज प्रिय व्यक्तीला भेटू शकता. कदाचित जुन्या आठवणीही ताज्या होतील. आज तापाची समस्या होऊ शकते. लहान-मोठ्या आजारांपासून दूर राहा. आज मनोरंजनात दिवस जाईल. आज मनाची इच्छा पूर्ण होईल. मनासारखे सगळे घडेल. आज कोणाशीही संवाद साधताना सावधगिरी बाळगा. आज व्यवसायात प्रगती होईल.
39
अंक ३ (कोणत्याही महिन्यात ३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेली व्यक्ती)
गणेश म्हणतात, घरात प्रगती होईल. आज आर्थिक स्थिती सुधारेल. पैशांच्या गरजा पूर्ण होतील. आज तुम्ही तुमचे ध्येय गाठण्यात यशस्वी व्हाल. यश पदरात पडल्याचा आनंद मिळेल. आज आत्मविश्वास वाढेल. आनंद द्विगुणीत होईल. आज जमीन संबंधित कामातील अडचणी दूर होतील. आज घरात नवीन वस्तू खरेदी करू शकता.
अंक ४ (कोणत्याही महिन्यात ४, १३, २२ आणि ३१ तारखेला जन्मलेली व्यक्ती)
गणेश म्हणतात, गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे. फक्त गुतवणूक करण्यापूर्वी नियम आणि अटी नीट काळजीपूर्वक वाचून घ्या. आज खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. बाहेरचे जास्त खाऊ नका. आज सर्जनशील कामात रस वाढेल. आज पत्नीशी संबंध सुधारतील. कौटुंबीक संबंध सुधारतील. शारीरिक अपेक्षा पूर्ण होतील. आज कामाच्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती अनुकूल असेल. यकृताची समस्या होऊ शकते.
59
अंक ५ (कोणत्याही महिन्यात ५, १४, २३ तारखेला जन्मलेली व्यक्ती)
गणेश म्हणतात, मोठ्या संभ्रमातून मुक्ती मिळेल. मनातील जळमटे दूर होतील. त्यामुळे मुक्त झाल्यासारखे वाटेल. आज पत्नीच्या आरोग्याकडे लक्ष द्या. जवळच्या नातेवाईकांशी चांगले संबंध राहतील. आज सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. आज कोणत्याही कामात तुम्हाला त्रास होऊ शकतो. नवीन कामाची सुरवात करताना दहा वेळा विचार करा.
69
अंक ६ (कोणत्याही महिन्यात ६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेली व्यक्ती)
गणेश म्हणतात, पती-पत्नीचे नाते सुधारेल. एकमेकांना सुख देणे आणि घेणे असा अनुकूल आजचा दिवस आहे. आज आरोग्याकडे लक्ष द्या. आज तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करू नका. आज विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्या. त्यातूनच प्रगतीचा मार्ग गवसेल. आज राग आणि अहंकार नियंत्रणात ठेवा. त्यामुळे शक्यतोवर कमी बोलण्याला प्राधान्य द्या.
79
अंक ७ (कोणत्याही महिन्यात ७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेली व्यक्ती)
गणेश म्हणतात, दिवसाचा बराचसा वेळ शांततेत जाईल. मानसिक शांतता राखा. आज पती-पत्नीचे नाते गोड राहील. दोघांना एकमेकांची मोलाची साथ लाभेल. आज दुपारनंतर परिस्थिती अनुकूल असेल. दुपारनंतर कामाचे नियोजन करा. आज धार्मिक कामात रस वाढेल. तुम्हाला पुजेचा मान मिळण्याची शक्यता आहे. आज मित्रांची भेट होईल.
89
अंक ८ (कोणत्याही महिन्यात ८, १७ आणि २६ तारखेला जन्मलेली व्यक्ती)
गणेश म्हणतात, समाजसेवा कार्यात तुमचा सहभाग असेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आज घरात काही बदल होतील. काही तुमच्या मनासारखे असतील तर काही बदल तुम्हाला आवडणार नाहीत. आज गुंतवणूक टाळा. आज रखडलेल्या कामांना गती येईल. त्याचे समाधान लाभेल.
99
अंक ९ (कोणत्याही महिन्यात ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेली व्यक्ती)
गणेश म्हणतात, अध्यात्मिक कामात तुमचा रस असेल. मानसिक समाधान लाभेल. मन शांत राहील. त्यामुळे आरोग्य चांगले राहील. आज घरी मुलांमुळे तणाव राहील. मुलांना त्यांचा स्पेस द्या. त्यांना समजून घ्या. आज जीवनमान उंचावेल. बँकेच्या कामात प्रगती होईल. बॅंकेची कामे मार्गे लागतील.