वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कर्मफळदाता शनि हा सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो, जो एका राशीत दीर्घकाळ राहतो. शनि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो, पण त्याला पुन्हा त्याच राशीत परत येण्यासाठी 30 वर्षे लागतात. सध्या शनीच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास, तो गुरूच्या मीन राशीत वक्री अवस्थेत भ्रमण करत आहे आणि नोव्हेंबर महिन्यात याच राशीत मार्गी होईल. जेव्हा शनि मीन राशीत असतो आणि दुसऱ्या ग्रहासोबत संयोग करतो, तेव्हा शुभ-अशुभ राजयोग तयार होतो. अशा स्थितीत, शनि कर्क राशीतील गुरू ग्रहासोबत विपरीत राजयोग तयार करत आहे. गुरु ग्रह 5 डिसेंबरपर्यंत कर्क राशीत राहील.