Temple Bell: मंदिरात गेल्यावर घंटा का वाजवतात? ९९% लोकांना यामागचं खरं कारण माहीत नाही

vivek panmand   | CMS
Published : Sep 23, 2026, 08:49 PM IST
Temple Bell: मंदिरात गेल्यावर घंटा का वाजवतात? ९९% लोकांना यामागचं खरं कारण माहीत नाही

सार

मंदिरात गेल्यावर घंटा वाजवणं ही फक्त एक सवय आहे का? अजिबात नाही. यामागे खूप मोठं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण दडलंय. आगम शास्त्रापासून ते मेंदूच्या विज्ञानापर्यंत, घंटेच्या आवाजात 'ओम'कार, निगेटिव्ह एनर्जी दूर करणं आणि जंतू नष्ट करण्याचं रहस्य लपलेलं आहे.

तुम्ही कधी नोटीस केलंय का, मंदिरात पाऊल ठेवताच आपला हात आपोआप घंटेवर जातो? 'टणकन' आवाज केल्याशिवाय देवदर्शन पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही. लहानपणापासून आपण हेच पाहत आलोय, म्हणून आपणही तेच करतो. पण शास्त्र सांगतं की, या छोट्याशा कृतीचा फायदा खूप मोठा आहे.

१. शास्त्रीय कारण - देवाला जागं करणं आणि अशुभ शक्तींना पळवून लावणं: हिंदू आगम शास्त्रानुसार, मंदिर हे देवाचं घर असतं. घंटा वाजवणं म्हणजे आपण आल्याची देवाला वर्दी देणं. जसं आपण कुणाच्या घरी गेल्यावर डोअरबेल वाजवतो, अगदी तसंच. असं म्हणतात की, घंटेच्या आवाजातून साक्षात 'ओम'चा उच्चार होतो. ओम हा सृष्टीचा मूळ शब्द आहे, ज्याला ब्रह्मनाद म्हणतात. हा आवाज ऐकून देवाची झोप मोडते, देव जागा होतो आणि भक्तांची हाक ऐकतो.

स्कंद पुराणात स्पष्ट सांगितलंय - "घंटानादं कृत्वा यः पूजां करोति, शताश्वमेध फलं लभेत्" म्हणजेच, घंटा वाजवून पूजा केल्यास १०० अश्वमेध यज्ञांइतकं पुण्य मिळतं. शिवाय, घंटेचा आवाज इतका पवित्र मानला जातो की, त्यामुळे भूत-प्रेत, अशुभ शक्ती आणि निगेटिव्ह एनर्जी मंदिर परिसरापासून दूर पळतात. म्हणूनच मंदिरात प्रवेश करताना नेहमी घंटा वाजवावी, बाहेर पडताना नाही.

२. वैज्ञानिक कारण - जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल:

क) मेंदूला रिसेट करणं: वैज्ञानिकांनी मोजून पाहिलंय की, मंदिरातील घंटेच्या आवाजाची तीव्रता (Pitch) साधारण ११०० ते १२०० Hz असते आणि त्याचा इको (Echo) किमान ७ सेकंद टिकतो. हा खोल आणि गंभीर आवाज कानावर पडताच, आपल्या मेंदूची डावी आणि उजवी बाजू एकाच वेळी ॲक्टिव्ह होते. बाहेरच्या जगातील हजारो विचार, ऑफिसचं टेन्शन, रस्त्यावरचा गोंधळ एका सेकंदात थांबतो. मन एकाग्र आणि शांत होतं, आणि पूजेसाठी तयार होतं. हे अगदी मेडिटेशन करताना बेल वाजवण्यासारखं आहे.

ख) पंचधातू आणि जंतूंचा नाश: मंदिरातील घंटा ही काही साधी घंटा नसते. ती तांबे, जस्त, लोखंड, निकेल आणि क्रोमियम या पाच धातूंपासून (पंचधातू) एका विशिष्ट प्रमाणात बनवली जाते. हे धातू अशा प्रकारे एकत्र केले जातात की, घंटा वाजवल्यावर जे व्हायब्रेशन (कंपन) तयार होतं, त्यामुळे हवेतील हानिकारक बॅक्टेरिया आणि जंतू नष्ट व्हायला मदत होते. प्राचीन काळी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवण्यामागे जे विज्ञान होतं, तसंच काहीसं हे आहे.

ग) शरीरातील ७ चक्रे: योगशास्त्रानुसार, घंटेचा खोल नाद आपल्या शरीरातील मूलाधार ते सहस्रार अशा सातही चक्रांना स्पर्श करतो आणि शरीरातील एनर्जी बॅलन्स करतो.

मग घंटा वाजवण्याची योग्य पद्धत कोणती? अनेक जण घंटेला फक्त हलकासा स्पर्श करून पुढे जातात. पण शास्त्र सांगतं की, घंटा अशी वाजवा की तिचा गंभीर आवाज किमान ७ सेकंद घुमत राहील. वाजवताना डोळे बंद करा आणि आपल्या इष्ट देवतेचं स्मरण करा. तसेच, दोन्ही हातांनी घंटा वाजवू नका. एका हाताने घंटा वाजवा आणि दुसऱ्या हाताने देवाला नमस्कार करा.

त्यामुळे पुढच्या वेळी मंदिरात जाल, तेव्हा फक्त सवय म्हणून नाही, तर हे विज्ञान आणि भक्ती लक्षात ठेवून घंटा वाजवा. बघा, तुम्हाला पूजेचा एक वेगळाच अनुभव येईल.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Daily Horoscope : काहींना अचानक धनलाभ, तर काहींची रखडलेली कामं पूर्ण होणार; 12 राशींचं भविष्य काय?
Vastu Tips For Main Door: मुख्य दरवाजावर चुकूनही लावू नका महादेवाची मूर्ती! मग कोणत्या देवाचा फोटो लावणं शुभ?