Paneer Butter Masala Recipe : घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला, वाचा रेसिपी

Published : Oct 01, 2026, 02:36 PM IST
Paneer Butter Masala Recipe : घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला, वाचा रेसिपी

सार

पनीर बटर मसाला हा पदार्थ जवळपास सर्वांनाच खूप आवडतो. बटरचा सुगंध, टोमॅटोची आंबट-गोड चव आणि क्रीमी ग्रेव्ही असलेला हा पदार्थ तुम्ही रोटी, नान, चपाती किंवा जिरा राईससोबत खाऊ शकता.

मुंबई : पनीरच्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये पनीर बटर मसाला हा सर्वांचा लाडका पदार्थ आहे. बटरचा सुगंध, टोमॅटोची आंबट-गोड चव आणि क्रीमी ग्रेव्ही असलेला हा पदार्थ तुम्ही रोटी, नान, चपाती किंवा जिरा राईससोबत खाऊ शकता. फक्त ३० मिनिटांत तुम्ही घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल पनीर बटर मसाला बनवू शकता.

पनीर बटर मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • पनीर – २०० ग्रॅम (चौकोनी तुकडे केलेले)
  • बटर – ३ मोठे चमचे
  • तेल – १ मोठा चमचा
  • कांदा – २ (चिरलेले)
  • पिकलेले टोमॅटो – ४
  • काजू – १०-१२
  • आले-लसूण पेस्ट – १ मोठा चमचा
  • काश्मिरी लाल तिखट – १.५ मोठा चमचा
  • गरम मसाला – १ छोटा चमचा
  • कसुरी मेथी – १ छोटा चमचा
  • फ्रेश क्रीम – २ मोठे चमचे
  • साखर – ¾ छोटा चमचा
  • मीठ – चवीनुसार

पनीर बटर मसाला बनवण्याची कृती:

  • पहिली स्टेप: एका कढईत १ मोठा चमचा बटर गरम करा. त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो आणि भिजवलेले काजू टाकून ते मऊ होईपर्यंत परतून घ्या.
  • दुसरी स्टेप: हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. रेस्टॉरंटसारखी स्मूथ ग्रेव्ही हवी असेल तर ही प्युरी गाळून घ्या.
  • तिसरी स्टेप: आता कढईत उरलेले बटर आणि तेल गरम करा. त्यात आले-लसूण पेस्ट आणि काश्मिरी लाल तिखट टाकून मंद आचेवर चांगले परतून घ्या.
  • चौथी स्टेप: यात तयार केलेली टोमॅटो प्युरी टाका आणि तेल सुटेपर्यंत साधारण ५-६ मिनिटे शिजवून घ्या.
  • पाचवी स्टेप: गरजेनुसार पाणी, मीठ, साखर आणि गरम मसाला टाकून ग्रेव्हीला उकळी येऊ द्या.
  • सहावी स्टेप: आता पनीरचे चौकोनी तुकडे ग्रेव्हीत टाका. मंद आचेवर फक्त २-३ मिनिटे शिजवा.
  • सातवी स्टेप: शेवटी कसुरी मेथी आणि फ्रेश क्रीम टाकून हलक्या हाताने मिक्स करा. त्यानंतर गॅस बंद करा.

रेस्टॉरंटसारख्या चवीसाठी या टिप्स फॉलो करा:

पनीर बटर मसाल्याची ग्रेव्ही वाटल्यानंतर ती गाळून घेतल्यास रेस्टॉरंटसारखी सिल्की आणि मऊ ग्रेव्ही तयार होते. पनीरचे तुकडे जास्त वेळ शिजवू नका. जास्त शिजवल्यास पनीर कडक आणि रबरासारखे होऊ शकते. गरमागरम पनीर बटर मसाला तुम्ही चपाती, नान, रोटी, पराठा किंवा जिरा राईससोबत खाऊ शकता.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

1K रुपयांच्या आत मिळणारे Diamond Replica Necklaces
Heavy Design Earrings : हेवी डिझाईन इअररिंग्ज.. पाहताच तुम्ही म्हणाल वाव!