Republic Day 2026 : प्रजासत्ताक दिनासाठी खास शुभेच्छा, व्हॉट्सॲप मेसेज, स्टेटस! २६ जानेवारीनिमित्त मित्र आणि नातेवाईकांना पाठवा २० प्रेमळ देशभक्तीपर संदेश.
Republic Day 2026 : प्रजासत्ताक दिनाचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच दिवशी भारताचे संविधान लागू झाले आणि आपला देश एक संपूर्ण गणराज्य म्हणून स्थापित झाला. हा दिवस केवळ संविधानाचा नसून प्रत्येक माणसाचा आहे, जो आपल्या कर्तव्यांची आठवण करून देतो. राजधानी दिल्लीत होणारे भव्य संचलन मन रोमांचित करते. विविध राज्यांचे चित्ररथ भारतीय संस्कृतीची विविधता दर्शवतात. या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी ५० व्हॉट्सॲप मेसेज आणि शुभेच्छा घेऊन आलो आहोत, जे तुम्ही मित्र आणि नातेवाईकांसोबत शेअर करू शकता.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
तिरंगा फडकावा, अभिमान जागा व्हावा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हक्कांचा अधिकार, कर्तव्यांची ओळख
आपला भारत सर्वात महान!
स्वातंत्र्याचा सण, संविधानाचा मान
प्रजासत्ताक दिनी देशवासियांना सलाम!
मनात विश्वास, देशाचा विकास
प्रजासत्ताक दिन घेऊन येवो नवी आस!
भाषा अनेक, ओळख एक, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छांसह आपला भारत महान!