
Relationship : प्रेम ही एक अशी भावना आहे, जी शब्दात व्यक्त करता येत नाही. लिंग, धर्म, वय यांसारख्या अनेक गोष्टींच्या पलीकडे प्रेम टिकून आहे. पण विवाहित व्यक्तीसोबतच्या प्रेमाला समाज स्वीकारत नाही. याचे परिणाम खूप वाईट असू शकतात. विवाहबाह्य संबंध टाळायलाच हवेत.
सध्या महिलांचे विवाहित पुरुषांसोबत प्रेमसंबंध असण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक महिला नकळतपणे या प्रेमचक्रात अडकतात. महिलांकडून ही चूक का होते, याची कारणे आपण येथे पाहूया.
महिला पुरुषांच्या काळजी घेण्याच्या स्वभावाकडे आकर्षित होतात. जे पुरुष त्यांच्याकडे लक्ष देतात, ते महिलांना खूप आवडतात. सामान्यतः विवाहित पुरुष अविवाहित पुरुषांपेक्षा जास्त सौम्यपणे वागतात आणि काळजी व्यक्त करतात.
विशेषतः ३० वर्षांवरील पुरुष अधिक परिपक्व झालेले असतात. त्यामुळे महिलांना कसे हाताळायचे हे त्यांना चांगले माहीत असते. यामुळे काही महिला त्यांच्याकडे आकर्षित होतात. अनेक महिला आकर्षण आणि प्रेम यात गोंधळ करतात. आकर्षण आणि मोह तात्पुरते असतात. यात भावनिक संबंध नसतात, फक्त एकप्रकारचा थरार अनुभवायला मिळतो.
विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडणाऱ्या महिला स्वाभिमान आणि आत्म-सन्मानाला जास्त महत्त्व देत नाहीत. त्या कदाचित आधीच्या नात्यात दुखावलेल्या असू शकतात. त्या मान्यता आणि प्रेमासाठी आसुसलेल्या असतात. त्यामुळे नवीन नात्यासाठी त्या स्वतःला बदलायला तयार होतात आणि स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतात. काही पुरुष याचा गैरफायदा घेतात.
विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडणाऱ्या महिलांना एकटेपणाची भीती वाटते. एक ना एक दिवस आपल्याला प्रेम मिळेल या आशेने त्या हे नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण याच नात्यात जास्त दुखावले जाण्याची शक्यता असते.
महिलांनो जर तुम्ही विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडला असाल, तर कोणताही विचार न करता मागे फिरा. तुमचा सन्मान आणि आदर महत्त्वाचा आहे. एकटेपणाची भीती वाटत असेल तर मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबासोबत वेळ घालवा. ते शक्य नसेल तर आपल्या आवडत्या छंदांमध्ये वेळ घालवा. विवाहित पुरुषावर प्रेम करणे हा उपाय नाही.
कोणत्याही नात्यात स्वाभिमान आवश्यक असतो. केवळ आकर्षण आणि मोहाला प्रेम समजू नका. प्रेम याच्या पलीकडचे असते, जे तुम्हाला भावनिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सुरक्षित वाटायला लावते.