
Ray-Ban आणि Meta यांनी भारतात Ray-Ban Meta Gen 2 AI स्मार्ट ग्लासेस अधिकृतपणे लाँच केले आहेत. नवीन पिढीच्या या AI ग्लासेसमध्ये सुधारित व्हिडिओ क्षमता, अधिक बॅटरी लाइफ, अपग्रेडेड एआय अनुभव आणि आकर्षक स्टाइल्सचा समावेश आहे. या ग्लासेसची किंमत ₹39,900 पासून सुरू होत असून Ray-Ban India आणि देशभरातील आघाडीच्या आयवेअर रिटेलर्सकडे उपलब्ध आहेत.
Ray-Ban Meta Gen 2 मध्ये 3K Ultra HD व्हिडिओ कॅप्चर, Ultra-Wide HDR आणि आधीपेक्षा अधिक सक्षम Meta AI मिळते. सुमारे 8 तास बॅटरी बॅकअप आणि 20 मिनिटांत 50% पर्यंत फास्ट चार्जिंग ही त्याची मोठी वैशिष्ट्ये आहेत. यासोबत 48 तासांचे अतिरिक्त पॉवर देणारे चार्जिंग केसही देण्यात आले आहे. भविष्यातील सॉफ्टवेअर अपडेटद्वारे Hyperlapse आणि Slow Motion मोड्सही जोडले जाणार आहेत, ज्यामुळे क्रिएटर आणि व्लॉगर्ससाठी हे ग्लासेस अधिक उपयुक्त ठरतील.
Ray-Ban Meta Gen 2 ग्लासेस तीन लोकप्रिय स्टाइल्समध्ये उपलब्ध आहेत—Wayfarer, Skyler आणि Headliner. या श्रेणीत Shiny Cosmic Blue, Shiny Mystic Violet आणि Shiny Asteroid Grey असे आकर्षक रंग देण्यात आले आहेत. आयकॉनिक Ray-Ban डिझाइनसह आधुनिक AI तंत्रज्ञानाचा संगम यामध्ये दिसतो.
Meta AI आता अधिक वेगवान आणि वापरकर्तानुकूल बनले आहे. “Hi Meta” म्हटले की वापरकर्त्यांना माहिती, शिफारसी, क्रिएटिव्ह प्रॉम्प्ट्स अशा सेवा त्वरित मिळतात. कन्फर्जन मोड मोठ्या आवाजातही संवाद स्पष्ट करतो. विशेष म्हणजे — Meta AI आता संपूर्णपणे हिंदीला सपोर्ट करते, त्यामुळे वापरकर्ते फोटो-कॅप्चर, व्हिडिओ, नोटिफिकेशन कंट्रोल आणि मेसेजेस यासारख्या कामांसाठी एआयसह सहज संवाद साधू शकतात.
Meta AI मध्ये सेलिब्रिटी AI Voice फीचर जोडले असून, आता वापरकर्ते दीपिका पदुकोणच्या AI आवाजासोबतही संवाद साधू शकतात. जागतिक AI Voices लाइनअपमध्ये इतर लोकप्रिय सेलेब आवाजांचेही पर्याय उपलब्ध आहेत.
लवकरच Ray-Ban Meta Gen 2 ग्लासेसमधून थेट UPI Lite QR पेमेंट करण्याची सुविधा सुरू होईल. ग्लासेस घालून QR Code कडे पाहा आणि म्हणा — “Hi Meta, Scan and Pay” यानंतर WhatsApp-लिंक्ड बँक अकाऊंटद्वारे पेमेंट पूर्ण होईल. फोन हातात घेण्याची गरजही नाही. भविष्यात हे दैनंदिन व्यवहार आणखी सोपे आणि जलद करतील.