Rang Panchami 2026: नक्की तारीख कोणती, 7 की 8 मार्च? जाणून घ्या सगळं काही

Published : Feb 28, 2026, 02:00 PM IST
Widows Holi

सार

होळीचा सण संपला की वेध लागतात ते रंगपंचमीचे. पण हा सण मुख्यत्वे मध्य प्रदेशच्या माळवा प्रांतात जास्त उत्साहात साजरा होतो. या दिवशी पक्के रंग लावले जातात, म्हणूनच याला रंगपंचमी म्हणतात.

2026 मध्ये रंगपंचमी कधी आहे: होळी हा रंगांचा सण आहे. होळीचा उत्सव फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून सुरू होतो आणि चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला संपतो. म्हणजे जवळपास १० दिवस हा उत्सव चालतो. रंगपंचमीने या उत्सवाची सांगता होते. हा सण देशाच्या काही भागांमध्येच साजरा केला जातो. मध्य प्रदेशच्या माळवा प्रांतात याची सर्वात जास्त धूम पाहायला मिळते. चला तर मग जाणून घेऊया, यावर्षी रंगपंचमी कधी साजरी केली जाईल आणि या सणाशी संबंधित खास गोष्टी…

कधी आहे रंगपंचमी 2026?

धर्मग्रंथानुसार, रंगपंचमीचा सण चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो. यावर्षी ही तिथी ७ मार्च, शनिवारी संध्याकाळी ७ वाजून १७ मिनिटांनी सुरू होईल आणि ८ मार्च, रविवारी रात्री ९ वाजून ११ मिनिटांपर्यंत राहील. पंचमी तिथीचा सूर्योदय ८ मार्च, रविवारी होणार असल्याने, त्याच दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जाईल.

रंगपंचमी का साजरी करतात?

एका प्रचलित कथेनुसार, हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस होता. तो भगवान विष्णूंना आपला शत्रू मानत असे. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा परमभक्त होता. जेव्हा हिरण्यकश्यपूला हे कळलं, तेव्हा त्याने आपल्या मुलाला मारण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण तो प्रत्येक वेळी अयशस्वी ठरला. शेवटी त्याने प्रल्हादला मारण्यासाठी आपली बहीण होलिका हिच्यासोबत अग्नीत बसवले. तब्बल ५ दिवस प्रल्हाद आणि होलिका अग्नीत बसले होते. या दरम्यान होलिकेचा मृत्यू झाला आणि प्रल्हाद सुखरूप बाहेर आले. जेव्हा लोकांनी हे पाहिलं, तेव्हा त्यांच्यात मोठा उत्साह आणि आनंद पसरला आणि सर्वांनी रंगांची उधळण करत उत्सव साजरा केला. तेव्हापासून रंगपंचमीचा सण साजरा केला जातो, असं मानलं जातं.

इंदूरमध्ये निघते जगप्रसिद्ध 'गैर'

रंगपंचमीच्या निमित्ताने मध्य प्रदेशातील इंदूर शहरात पारंपरिक 'गैर' काढली जाते. 'गैर' म्हणजे एक प्रकारची मिरवणूक. जशी आपल्याकडे पुण्या-मुंबईत गणेश विसर्जनाची मिरवणूक प्रसिद्ध आहे, तशीच इंदूरमध्ये रंगपंचमीची 'गैर' प्रसिद्ध आहे. या गैरचं आयोजन स्थानिक प्रशासनाकडूनच केलं जातं. विशेष म्हणजे, या मिरवणुकीत तब्बल ४ ते ५ लाख लोक सहभागी होतात. याच कारणामुळे या 'गैर'ला युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक वारसा यादीत स्थान मिळालं आहे. सध्या ही 'गैर' इंदूर शहराची ओळख बनली आहे.


Disclaimer
या लेखातील माहिती धर्मग्रंथ, अभ्यासक आणि ज्योतिषी यांच्याकडून घेण्यात आली आहे. आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहोत. वाचकांनी या माहितीकडे केवळ एक सूचना म्हणून पाहावं.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Tash Silk Suit For Ramadan: प्रत्येक मुलीची इच्छा; असा एकतरी सूट हवाच!
Holi Makeup: होळीत मेकअप खराब होण्याची चिंता सोडा! या 6 टिपमुळे डोळ्यांचा मेकअप राहील 'जैसे थे'