Ramadan Special Food Recipe : इफ्तारसाठी तयार करा स्पेशन मटण बिर्याणी, वाचा रेसिपी

Published : Mar 14, 2025, 01:53 PM ISTUpdated : Mar 14, 2025, 03:07 PM IST
Mutton Biryani

सार

रमजानच्या दिवसात स्वादिष्ट असे वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. अशातच इफ्तार पार्टीसाठी स्पेशल मटण बिर्याणी कशी तयार करायची याची रेसिपी सविस्तर जाणून घेऊया.

Ramadan Special Food Recipe : रमजाना पवित्र महिना इबादत आणि संयमाचा मानला जातो. यादरम्यान मुस्लिम बांधव रोजा ठेवतात. म्हणजेच संपूर्ण दिवस उपवास ठेवला जातो. इफ्तार वेळी खास पदार्थ तयार केले जातात. अशातच यंदाच्या इफ्तारवेळी मटण बिर्याणी कशी तयार करायची याची सोपी रेसिपी सविस्तर जाणून घेऊया.

सामग्री

  • 500 ग्रॅम मटण
  • 2 कप बासमती तांदूळ
  • अर्धा वाटी दही
  • 2 मोठे कांदे
  • टोमॅटो बारीक चिरलेले
  • आलं-लसूण पेस्ट
  • 3-4 हिरव्या मिरची
  • पुदीना
  • कोथिंबीर
  • बिर्याणीसाठी मसाले
  • 2 तमालपत्र
  • 2 मोठी वेलची
  • 4 हिरव्या मिरची
  • 5-6 लवंग
  • दालचिनी
  • 1 चमचा जीरे
  • अर्धा चमचा हळद
  • लाल मिरची पावडर
  • गरम मसाला
  • मीठ चवीनुसार
  • तूप किंवा तेल

मटण बिर्याणी कृती

  • एका वाटीत मटण घ्या आणि त्यामध्ये दही, आलं-लूसण पेस्ट, हळद, लाल मिरची पावडर, धणे पावडर, गरम मसाला आणि मीठ मसाला घालून व्यवस्थितीत मिक्स करा. हे मॅरिनेशन 1-2 तास ठेवून द्या.
  • दुसऱ्या बाजूला मोठ्या भांड्यात पाणी उकळून घ्या. यामध्ये तमालपत्र, हिरवी मिरची, लवंग, जीरे आणि थोडे मीठ घाला. पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये भिजवलेले तांदूळ घाला. तांदूळ अर्धवट शिजवून घ्या.
  • मोठ्या पॅनमध्ये तूप किंवा तेल गरम करा. यामध्ये कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या. यामध्ये टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. सर्व मसाले व्यवस्थितीत शिजवून घ्या. यामध्ये मॅरिनेट करण्यात आलेले मटण घालून मंच आचेवर सर्व सामग्री भाजून घ्या.
  • मटण व्यवस्थितीत शिजल्यानंतर यामध्ये अर्धा कच्च्या तांदळाची एक लेअर लावा. यावरुन तूप आणि तळलेला कांदा, पुदीना आणि केशरयुक्त दूध घालून टोप व्यवस्थितीत बंद करा.
  • 20-25 मिनिटानंतर गरमागरम मटण बिर्याणी रायता किंवा सॅलडसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा. याचा सुगंध आणि टेस्ट नक्कीच तुम्हाला आवडेल.
  •  

PREV

Recommended Stories

आत्याचं स्पेशल गिफ्ट! 2 ते 5 हजारात भाचीसाठी खरेदी करा सर्वात सुंदर चांदीचे पैंजण!
वधू होणार खुश! फक्त 10,000 मध्ये खरेदी करा हे 'युनिक' आणि भारी पैंजण डिझाईन्स!