आपल्या सनातन धर्मात, दिव्यासोबत अगरबत्ती (धूप) लावण्याची एक पवित्र परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे. पूजेच्या वेळी अगरबत्तीचा सुगंध घरभर पसरतो आणि देवघरात एक शांत, प्रसन्न वातावरण तयार होतं. यामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते, असा अनेकांचा विश्वास आहे. पण देवापुढे नेमक्या किती अगरबत्त्या लावाव्यात? तज्ज्ञ काय म्हणतात?
23
मनातली श्रद्धा आणि शुद्धता जास्त महत्त्वाची
रोजच्या पूजेत एक किंवा दोन अगरबत्त्या लावल्या तरी पुरेसं आहे. पूजेमध्ये संख्येपेक्षा मनातली श्रद्धा आणि शुद्धता जास्त महत्त्वाची असते. जास्त अगरबत्त्या लावल्याने जास्त पुण्य मिळतं, असं कोणत्याही धर्मशास्त्रात सांगितलेलं नाही. उलट, जास्त धूर झाल्यास घरात कोंदट वातावरण होतं आणि श्वसनाचे त्रास होऊ शकतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट प्रमाणातच केलेली बरी. अगरबत्तीचा सुगंध मनाला एकाग्र करून ध्यान किंवा जप करण्यासाठी मदत करतो. तसेच, तो घरातली नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो आणि वातावरण शुद्ध करतो, असं मानलं जातं.
33
काही अनिवार्य नियम नाही
देवघर नेहमी स्वच्छ ठेवा. अगरबत्त्या जमिनीवर न लावता नेहमी सुरक्षित आणि स्थिर स्टँडमध्येच लावा. अगरबत्ती पेटवल्यानंतर तिची ज्योत विझवून फक्त धूर येईल याची खात्री करा. पेटवलेली अगरबत्ती कधीही तशीच सोडून जाऊ नका. आरोग्याचा विचार करून, तीव्र रसायनं (केमिकल्स) आणि जास्त धूर करणाऱ्या अगरबत्त्या टाळलेल्याच बऱ्या. नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या अगरबत्त्या निवडणं चांगलं. पूजेत दिव्यासोबत अगरबत्ती लावणं शुभ मानलं जातं, पण तो काही अनिवार्य नियम नाही. अगरबत्ती लावली नाही म्हणून देव तुमच्यावर रागवणार नाही. शेवटी, देवाला तुमची भक्ती आणि निःस्वार्थ भावना हवी असते. निर्मळ मनाने एक नमस्कार केला तरी त्याची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.