
मुंबई : परदेशात प्रवास करताना अनेक कागदपत्रांची गरज असते आणि प्रत्येकाचं एक वेगळं महत्त्व असतं. जर तुम्हालाही पासपोर्ट आणि व्हिसामध्ये नेमका काय फरक आहे, असा प्रश्न पडला असेल, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. हे दोन्ही डॉक्युमेंट्स खूप महत्त्वाचे आहेत, पण अनेकदा लोक या दोन्हींमध्ये कन्फ्युज होतात. पासपोर्ट आणि व्हिसामधला मुख्य फरक काय आहे, ते आपण समजून घेऊया.
पासपोर्ट हे एक अधिकृत ओळखपत्र असतं, जे तुमची ओळख आणि नागरिकत्व सिद्ध करतं. यामध्ये तुमचा फोटो, नाव, पत्ता, वय आणि राष्ट्रीयत्व यासारखी महत्त्वाची माहिती दिलेली असते.
व्हिसा म्हणजे तुम्ही ज्या देशात जाणार आहात, त्या देशाने तुम्हाला दिलेली अधिकृत परवानगी. या परवानगीमुळे तुम्हाला त्या देशात प्रवेश करता येतो, तिथे राहता येतं किंवा तिथून प्रवास करता येतो.
पासपोर्ट हा तुमच्या स्वतःच्या देशाचं सरकार (म्हणजेच भारत सरकार) देतं. तर व्हिसा हा तुम्ही ज्या देशात जाणार आहात, तिथलं सरकार तुम्हाला देतं.
पासपोर्टची व्हॅलिडिटी साधारणपणे ५ ते १० वर्षांची असते. पण व्हिसाची मुदत ही व्हिसाच्या प्रकारावर अवलंबून असते. ती ३० दिवसांपासून ते ५ वर्षांपर्यंत असू शकते. काही विशिष्ट अटींवर ती वाढवूनही मिळते.
भारतात प्रामुख्याने ४ प्रकारचे पासपोर्ट दिले जातात. ते कोणाला दिले जातात, यावर त्यांचे प्रकार ठरतात. ते खालीलप्रमाणे आहेत -
भारत २० पेक्षा जास्त प्रकारचे व्हिसा देतो. यामध्ये टुरिस्ट, बिझनेस, एज्युकेशन, वर्क आणि ट्रान्झिट व्हिसाचा समावेश आहे. यात रेग्युलर व्हिसा आणि ई-व्हिसा असेही भाग आहेत. भारतातील काही प्रमुख व्हिसा प्रकार खालीलप्रमाणे आहेत -
आता तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा या दोन्ही ट्रॅव्हल डॉक्युमेंट्सचा उपयोग आणि त्यांचे प्रकार नक्कीच समजले असतील. एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करताना हे दोन्ही खूप महत्त्वाचे असतात.
भारतीय प्रवाशांसाठी काही देश 'व्हिसा फ्री' (Visa Free) आहेत, तर काही ठिकाणी इमर्जन्सी ई-व्हिसा किंवा 'व्हिसा ऑन अरायव्हल'ची (Visa on Arrival) सुविधाही मिळते.