घरातल्या मोलकरणीसोबत असलेलं नवऱ्याचं प्रेमप्रकरण चक्क पोपटाने उघड केल्याची एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. पोपटाने ही घटना त्याच्या पत्नीला कशी सांगितली असेल? नेमके काय घडले असेल?
चूक केल्यावर पुरावे कोणत्याही रूपात मिळू शकतात याचं हे जिवंत उदाहरण आहे. घरात चांगली बायको असतानाही घरकाम करणाऱ्या महिलेसोबत प्रेमप्रकरण ठेवणाऱ्या नवऱ्याचं पितळ पोपटाने उघड केलं.
27
पोपटाची साक्ष
विचित्र वाटली तरी ही खरी घटना आहे. या पोपटाच्या साक्षीमुळे नवऱ्याला तुरुंगवासही झाला आहे. ही घटना कुवेतमध्ये घडली आहे. या घटनेवर सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
37
पोपटाने उघड केलं सत्य
या दाम्पत्याने एक पोपट पाळला होता. बायको बाहेर गेल्यावर कामवालीसोबत नवऱ्याचं प्रेमप्रकरण सुरू राहायचं. हे पोपट पाहत होता. पोपट या प्रेमप्रकरणाला साक्षी होता.
नवऱ्याबद्दल बायकोला शंका होती, पण ती सिद्ध करू शकत नव्हती. काहीतरी करून हे शोधून काढायचं असं तिने ठरवलं होतं. तिला पुरावे हवे होते. त्यानंतर ती याचा गौप्यस्फोट करणार होती.
57
मालकिणीसाठी पोपट साक्षीदार
मालकिणीचं दुःख पोपटाला समजलं. त्याने हे सांगण्याचा प्रयत्न केला. शेवटी तो तिच्याकडे येऊन वारंवार कामवालीचं नाव घेऊ लागला. यावेळी तिची शंका खरी ठरली. तिला नवऱ्याचे गुपित समजले.
67
रंगेहाथ पकडला गेला
शंका पक्की झाल्याने पत्नीने पतीला रंगेहात पकडण्याचा बेत रचला. एक दिवस ती ऑफिसमधून लवकर घरी आली. यावेळी दोघे आयतेच सापडले.
77
नवऱ्याला शिक्षा
शेवटी हा खटला कोर्टात गेला. तिथे पोपटाच्या साक्षीचाही विचार करण्यात आला. प्रेमप्रकरणाचा आरोप सिद्ध झाल्याने त्याला तुरुंगवास झाला आहे.