Parenting: आपला मुलगा मोठा होऊन यशस्वी व्हावा आणि नाव कमवावं, असं प्रत्येक वडिलांना वाटतं. त्यासाठी ते सतत मेहनत घेतात. पण मुलाचं भविष्य घडवण्यासाठी फक्त चांगलं शिक्षण देणं पुरेसं नाही. वडिलांनीही काही सवयी बदलणं गरजेचं आहे.
वडिलांच्या वागण्याचा मुलांच्या जडणघडणीवर खूप प्रभाव पडतो. वडील कसे बोलतात? आईशी कसं वागतात? या सर्व गोष्टी मुलं बारकाईने पाहत असतात. वडिलांच्या प्रत्येक कृतीचा मुलावर परिणाम होतो. त्यामुळे मुलाला एक चांगला माणूस बनवण्यासाठी प्रत्येक वडिलांनी आधी स्वतःमधील काही सवयी सोडल्या पाहिजेत. या सवयी कोणत्या ते जाणून घेऊया.
26
पत्नीचा अपमान करणं थांबवा
वडील आईशी कसं वागतात, हे मुलगा नेहमी पाहत असतो. आईचा सर्वांसमोर अपमान करणं, तिला कमी लेखणं, तिच्या मताला किंमत न देणं, अशा वागण्याचा मुलाच्या मनावर नकारात्मक परिणाम होतो. जर वडील आईचा आदर करत नसतील, तर मुलाच्या मनातही नकळत स्त्रियांचा आदर करण्याची गरज नाही, अशी भावना निर्माण होऊ शकते.
36
छोट्या गोष्टींवर रागावणं टाळा
काही वडिलांना छोट्या-छोट्या गोष्टींवरून खूप राग येतो. मुलांनी चूक केली, वस्तू खराब केली किंवा ऐकलं नाही की लगेच ओरडणं, मारहाण करणं, अशा गोष्टी ते करतात. अशा वागण्यामुळे मुलं वडिलांशी आपल्या समस्या शेअर करायला घाबरतात. शिवाय, राग आला की ओरडणं आणि इतरांवर चिडणं साहजिक आहे, असंही मुलांना वाटू शकतं.
मुलांनी प्रामाणिक असावं, असं प्रत्येक वडिलांना वाटतं. खोटं बोलू नये, नेहमी खरं बोलावं, असं ते सतत सांगत असतात. पण जर वडील मुलासमोरच छोट्या-छोट्या गोष्टींवर खोटं बोलत असतील, तर मुलं ते बघतात. फक्त शब्दांतून प्रामाणिकपणा शिकवून आणि कृतीतून खोटं बोलण्याला प्रोत्साहन दिल्यास मुलं त्या मूल्यांवर विश्वास ठेवत नाहीत.
56
घरातील कामात मदत न करणं थांबवा
घरातील सर्व कामं ही पत्नीचीच जबाबदारी आहे, असं मानणारे आजही अनेक वडील आहेत. स्वयंपाक करणं, घर स्वच्छ ठेवणं, मुलांना सांभाळणं या फक्त महिलांची कामं आहेत, असं त्यांना वाटतं. पण कुटुंब हे सर्वांचं असतं. वडिलांनी घरातील कामात मदत न करता पत्नीनेच सगळं करावं, अशी अपेक्षा ठेवल्यास मुलगाही तसाच विचार करण्याची शक्यता असते.
66
वाईट सवयी सोडणं गरजेचं
दारू, सिगारेट यांसारख्या वडिलांच्या वाईट सवयींचा मुलांवर गंभीर परिणाम होतो. काही वडील रोज दारू पिऊन घरी येतात आणि कुटुंबातील सदस्यांशी भांडतात. अशा वातावरणात वाढणाऱ्या मुलांना मानसिक त्रास होऊ शकतो. शिवाय, दारू पिणं ही एक सामान्य गोष्ट आहे, असंही मुलाला वाटू शकतं. त्यामुळे वडिलांनी अशा हानिकारक सवयींपासून दूर राहणं हिताचं ठरतं.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.