
OnePlus Nord 6 Series India Launch With 9000mAh Battery : चायनीज स्मार्टफोन ब्रँड OnePlus आपली Nord 6 सीरीज (OnePlus Nord 6 series) भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. या मोबाईल सिरीजमध्ये OnePlus Nord 6 आणि OnePlus Nord CE6 हे दोन फोन असतील. रिपोर्ट्सनुसार, हे दोन्ही फोन स्नॅपड्रॅगन चिपसेट आणि 9,000mAh क्षमतेच्या दमदार बॅटरीसह बाजारात येतील. दोन्ही फोनमध्ये बॅटरी, कॅमेरा आणि सुरक्षा रेटिंगसह काही समानता असण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, OnePlus Nord 6 सीरीजमधील स्मार्टफोनमध्ये चीनमधील Turbo 6 सीरीजप्रमाणेच फीचर्स असतील. त्यामुळे, OnePlus Turbo 6 आणि OnePlus Turbo 6V हे अनुक्रमे OnePlus Nord 6 आणि OnePlus Nord CE6 म्हणून रीब्रँड करून जागतिक बाजारात दाखल होतील, असा GSM Arena चा रिपोर्ट आहे. हे दोन्ही फोन 2026 च्या पहिल्या सहामाहीत भारतासह जागतिक बाजारात दाखल होतील. Nord 6 आणि Nord CE6 ला आधीच प्रमाणपत्रे मिळाल्यामुळे, लाँच लवकरच होण्याची शक्यता आहे.
लीक्सनुसार, OnePlus Nord 6 भारतीय बाजारात 165Hz रिफ्रेश रेट आणि 1,800 निट्स पीक ब्राइटनेससह फुलएचडी+ डिस्प्लेसह येईल. Qualcomm च्या Snapdragon 8s Gen 4 चिपसेटसह 12GB आणि 16GB रॅम, तसेच 256GB आणि 512GB UFS 4.1 स्टोरेज OnePlus Nord 6 मध्ये अपेक्षित आहे.
दुसरीकडे, OnePlus Nord CE6 मध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा डिस्प्ले असल्याचे म्हटले जात आहे. या फोनमध्ये Snapdragon 7s Gen 4 चिपसेट अपेक्षित आहे. Nord CE6 साठी 8GB आणि 12GB रॅम पर्याय, तसेच 256GB आणि 512GB UFS 3.1 स्टोरेज पर्याय सांगितले जात आहेत. Nord 6 सीरीजमधील दोन्ही फोन Android 16 वर आधारित ColorOS 16 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतील. 50MP मुख्य रियर कॅमेरा, 2MP सेकंडरी सेन्सर, 16MP सेल्फी कॅमेरा, 80W SuperVOOC फ्लॅश चार्जिंग, 27W वायर्ड रिव्हर्स चार्जिंग, IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंग्स OnePlus Nord 6 आणि OnePlus Nord CE6 स्मार्टफोनमध्ये समान असण्याची शक्यता आहे.