आज, शनिवार, 20 डिसेंबर रोजी मंगळ आणि चंद्राच्या संयोगाने धन योग बनलाआहे. तसेच एक उत्तम योगायोग म्हणजे आज शुक्र ग्रहसुद्धा संक्रमण करणार आहे. त्याचा पाच ग्रहांना फायदा होणार आहे. ते ग्रह कोणते हे आपण पाहूया -
मेष राशीसाठी शनिवार, 20 डिसेंबर हा दिवस शुभ राहील. नशिबामुळे अनेक कामांत यश मिळेल. नोकरीत प्रगती आणि व्यवसायात चांगला नफा होईल. वडिलांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. मालमत्तेबाबत फायदा होईल.
25
मिथुन राशी
मिथुन राशीसाठी आज, शनिवारचा दिवस चांगला आहे. भागीदारी आणि टीमवर्कमधून फायदा होईल. काही इच्छांची पूर्तता होईल, त्यामुळे आनंद मिळेल. आर्थिक लाभ होईल आणि सन्मान वाढेल. वैवाहिक जीवन सुखकर राहील.
35
सिंह राशी
सिंह राशीला शनिवार, 20 डिसेंबरला परदेशातून लाभ मिळू शकतो. परदेशी कामांमध्ये नफ्याची संधी आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. राजकीय संबंधांचा फायदा होऊ शकतो. अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाने यश मिळेल.
धनु राशीसाठी आज, शनिवारचा दिवस चौफेर लाभ देणारा असेल. नशीब प्रगतीचे दरवाजे उघडेल. मोठे यश आणि आनंद मिळेल. अधिकारी आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. मालमत्तेशी संबंधित कामात नफा संभवतो.
55
मीन राशी
मीन राशीसाठी 20 डिसेंबर हा दिवस शुभ आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तणाव दूर होईल. वडिलांकडून लाभ मिळतील. दीर्घकालीन गुंतवणुकीतून उत्पन्न वाढेल. वाहन सुख मिळू शकते.