मुंबई - प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार तुमचा आजचा दिवस कसा जाईल ते पहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण आहे ते जाणून घ्या.
अंक १ (कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेले व्यक्ती)
गणेश सांगतात, नवीन प्रकल्पाचे काम सुरू करू शकता. आज आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. निकटवर्तीयांच्या मदतीने एखादी अडचण सोडवू शकाल. दिवस आरोग्याच्या दृष्टीने थोडा गुंतागुंतीचा पण महत्त्वाचा राहील.
अंक २ (कोणत्याही महिन्याच्या २, ११, २० आणि २९ तारखेला जन्मलेले व्यक्ती)
गणेश सांगतात, कोणतेही नवे काम करण्यापूर्वी कुटुंबीयांशी चर्चा करा. आज कार्यक्षेत्रात सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकतात. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. करिअरशी संबंधित क्षेत्रात प्रगती दिसेल.
25
अंक ३ (कोणत्याही महिन्याच्या ३, १२, ২১ आणि ३० तारखेला जन्मलेले व्यक्ती)
गणेश सांगतात, दैनंदिन शिस्त सांभाळा. व्यावसायिक कामांवर लक्ष केंद्रित करा. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आज अध्यात्मिक आनंद मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा.
अंक ४ (कोणत्याही महिन्याच्या ४, १३, २२ आणि ३१ तारखेला जन्मलेले व्यक्ती)
गणेश सांगतात, आर्थिक क्षेत्रात प्रगती होईल. अडकलेली कामे पुन्हा गती घेतील. व्यवसायिक कामांकडे लक्ष द्या. मानसिक शांतता अनुभवता येईल.
35
अंक ५ (कोणत्याही महिन्याच्या ५, १४ आणि २३ तारखेला जन्मलेले व्यक्ती)
गणेश सांगतात, सकारात्मक लोकांसोबत वेळ घालवाल. पती-पत्नीच्या नात्यात सुधारणा होईल. नवीन निर्णय घेऊ शकता. वैवाहिक जीवन अधिक गोड होईल.
अंक ६ (कोणत्याही महिन्याच्या ६, १५ आणि २४ तारखेला जन्मलेले व्यक्ती)
गणेश सांगतात, आर्थिक दृष्टिकोनातून उत्तम दिवस. उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडतील. आरोग्याविषयी थोडी चिंता उद्भवू शकते. व्यवसायाशी संबंधित काम यशस्वीरीत्या पार पडेल.
अंक ७ (कोणत्याही महिन्याच्या ७, १६ आणि २५ तारखेला जन्मलेले व्यक्ती)
गणेश सांगतात, कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या स्वतःवर घेऊ नका. मालमत्ता खरेदी किंवा विक्रीची योजना करू शकता. सर्व कामांमध्ये संयम ठेवा. काही कामांमध्ये वेळ वाया जाण्याची शक्यता आहे.
अंक ८ (कोणत्याही महिन्याच्या ८, १७ आणि २६ तारखेला जन्मलेले व्यक्ती)
गणेश सांगतात, ग्रहस्थिती अनुकूल राहील. सहकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याचा लाभ होईल. दिवस कठोर परिश्रमात जाईल. जीवनात सकारात्मक विचार ठेवा.
55
अंक ९ (कोणत्याही महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेले व्यक्ती)
गणेश सांगतात, घेतलेले कर्ज परत करण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिक शिक्षणात यश येईल. कार्यक्षेत्रात योग्य निर्णय घेऊ शकता. जमिनीसंबंधी किंवा वाहन कर्ज घेण्यासाठी योग्य दिवस आहे.