प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस तुमचा कसा जाईल ते पहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण.
अंक १ (ज्यांचा जन्म महिन्याच्या १, १०, १९ किंवा २८ तारखेला झाला आहे)
गणेशजी सांगतात की, आयुष्यात बदल घडणार आहेत. अडचणी सुटतील. या काळात अनोळखी लोकांशी संपर्क होऊ शकतो. कामाचा ताण आरोग्यावर परिणाम करू शकतो. कर्ज घेऊ नका.
29
अंक २ (ज्यांचा जन्म महिन्याच्या २, ११, २० किंवा २९ तारखेला झाला आहे)
गणेशजी म्हणतात की, मालमत्तेशी संबंधित शासकीय कामे पूर्ण होऊ शकतात. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. वाहन चालवताना काळजी घ्या.
39
अंक ३ (ज्यांचा जन्म महिन्याच्या ३, १२, २१ किंवा ३० तारखेला झाला आहे)
गणेशजींचे म्हणणे आहे की, आजचा दिवस परिश्रमात जाईल. व्यवसायिक प्रगतीची शक्यता आहे. मनाऐवजी बुध्दीचा वापर करा. छोटी चूकही त्रासदायक ठरू शकते, म्हणून खबरदारी घ्या.
अंक ४ (ज्यांचा जन्म महिन्याच्या ४, १३, २२ किंवा ३१ तारखेला झाला आहे)
गणेशजी सांगतात की, नातेवाईक भेटायला येऊ शकतात. घरात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात सुधारणा होईल. रागावर नियंत्रण ठेवा.
59
अंक ५ (ज्यांचा जन्म महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला झाला आहे)
गणेशजी म्हणतात की, मानसिक शांती मिळेल. कामाचे वातावरण अनुकूल असेल. डोकेदुखी किंवा मायग्रेनची समस्या वाढू शकते. इतरांच्या मत्सराचा सामना करावा लागू शकतो. करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे.
69
अंक ६ (ज्यांचा जन्म महिन्याच्या ६, १५ किंवा २४ तारखेला झाला आहे)
गणेशजी सांगतात की, घराच्या देखभालीसंबंधी कामात प्रगती होईल. हवामानामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास वाढू शकतो. वैयक्तिक कामांमध्ये अडथळा येऊ शकतो.
79
अंक ७ (ज्यांचा जन्म महिन्याच्या ७, १६ किंवा २५ तारखेला झाला आहे)
गणेशजी म्हणतात की, ग्रहांची स्थिती अनुकूल आहे. तरीही आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. घरात आनंदाचे वातावरण राहील. मुलांबरोबर वेळ घालवाल. मनोरंजनात दिवस जाईल.
89
अंक ८ (ज्यांचा जन्म महिन्याच्या ८, १७ किंवा २६ तारखेला झाला आहे)
गणेशजी सांगतात की, आर्थिक स्थिती सुधारेल. आरोग्याबाबत जागरूक राहा. गुंतवणुकीसाठी योग्य दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल.
99
अंक ९ (ज्यांचा जन्म महिन्याच्या ९, १८ किंवा २७ तारखेला झाला आहे)
गणेशजी सांगतात की, निर्णय घेताना सावध राहा. पती-पत्नीमध्ये तणाव होऊ शकतो. प्रतिकूल परिस्थितीमुळे संभ्रम निर्माण होईल. योग्य निर्णय घ्या. मुलांकडून समाधानकारक परिणाम मिळाल्यास मन प्रसन्न होईल.