अंकशास्त्रानुसार (Numerology) काही विशिष्ट तारखांना जन्मलेल्या लोकांमध्ये खास गुण असतात. हे लोक ज्या कामात हात टाकतात, तिथे त्यांना खूप लवकर यश मिळतं. विशेषतः काही जन्मतारखा यशासाठी अत्यंत शुभ मानल्या जातात.
जन्मतारीख आणि आपल्या स्वभावाचा काही संबंध असतो का, याची अनेकांना उत्सुकता असते. अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून माणसाचा स्वभाव, विचार आणि निर्णय घेण्याची पद्धत समजते. अंकशास्त्र सांगतं की, काही विशिष्ट तारखांना जन्मलेल्या लोकांमध्ये जिद्द, आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि पटकन निर्णय घेण्याचे गुण असतात. यामुळेच हे लोक आयुष्यात लवकर यशस्वी होतात. चला तर मग, या तारखा कोणत्या आहेत ते पाहूया.
25
१ तारखेला जन्मलेले लोक
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या १ तारखेला जन्मलेल्या लोकांवर सूर्याचा प्रभाव असतो. त्यांच्यात नेतृत्व करण्याची जबरदस्त क्षमता असते. दुसऱ्याने दाखवलेल्या वाटेवर चालण्यापेक्षा स्वतःचा नवीन रस्ता तयार करायला त्यांना जास्त आवडतं. एखादं काम करायचं ठरवलं, तर ते पूर्ण करण्याची त्यांची जिद्द पाहण्यासारखी असते. नोकरी, व्यवसाय किंवा कोणत्याही क्षेत्रात हे लोक संधीचा पुरेपूर फायदा घेतात.
35
५ तारखेला जन्मलेले लोक
अंकशास्त्र सांगतं की, कोणत्याही महिन्याच्या ५ तारखेला जन्मलेले लोक खूप चतुर आणि हुशार असतात. नवीन गोष्टी पटकन शिकणं आणि परिस्थितीशी जुळवून घेणं हा त्यांचा खास गुण आहे. जिथे संधी दिसेल, तिथे ते फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. कम्युनिकेशन, बिझनेस, मार्केटिंग किंवा मीडियासारख्या क्षेत्रात त्यांचा हा चतुर स्वभाव त्यांना खूप लवकर ओळख मिळवून देतो.
अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या ८ तारखेला जन्मलेले लोक स्वभावाने खूप कष्टाळू असतात. आयुष्यातील अडचणींना न घाबरता संयमाने पुढे जाणं ही त्यांची सर्वात मोठी ताकद असते. त्यांच्या आयुष्यात यश यायला कदाचित थोडा वेळ लागतो, पण ते यश दीर्घकाळ टिकतं. जबाबदारीची जाणीव, शिस्त आणि जिद्दीने काम केल्यामुळे करिअरमध्ये ते खूप चांगल्या पदावर पोहोचतात.
55
९ तारखेला जन्मलेले लोक
अंकशास्त्रानुसार, ९ तारखेला जन्मलेले लोक खूप धाडसी, आत्मविश्वासी आणि उत्साही असतात. आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची तीव्र इच्छा त्यांच्यात असते. कठीण प्रसंगातही हे लोक कधीच मागे हटत नाहीत. इतरांना मदत करण्याची वृत्ती त्यांच्यात असते. स्वतःच्या टॅलेंटचा योग्य वापर केल्यास हे लोक आयुष्यात खूप लवकर ओळख आणि यश मिळवतात.