मुंबई - लग्नाची पहिली रात्र अत्यंत खास असते. या दिवशी दोन जिवांचे मिलन होते. मानसिक आणि शारीरिक संबंधांना खरी सुरुवात होते. पण अनेकदा या रात्री तरुणी काही चुका करतात. त्याचे शल्य आयुष्यभर राहते. तरुणी या रात्री नेमक्या काय चुका करतात. पुढे वाचा…
लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीबद्दल म्हणजेच मधुचंद्राच्या रात्रीबद्दल एक वेगळीच उत्सुकता असते. अनेक वर्षांपासून पाळलेली बंधने या दिवशी सैल होतात. एका वेगळ्या जगात दोघांचा प्रवेश होतो. पहिली रात्र दोघांसाठीही सुंदर असते, पण तरुणींच्या चुकांमुळे ती सुंदर रात्र खराब होते. मग जाणून घ्या तरुणी कोणत्या चुका करतात...
27
सुरवात पतीला करु द्या
काही तरुणी लग्नानंतरच्या पहिल्या रात्री खूप अधीर असतात. त्या बोलायची किंवा इतर सुरवात स्वतः करायचा प्रयत्न करतात. पण असे कधीही करु नये. हे पुरुषांना आवडत नाही. लक्षात ठेवा की अशी घाई तुम्हाला अडचणीत आणू शकते. तुमची पहिली रात्र खराब करू शकते. त्यावेळी तुम्ही शांत आणि संयमी राहावे. कोणत्याही गोष्टीची सुरवात तरुणांना करु द्या. तुम्ही फक्त त्या क्षणांचा आनंद लुटा.
37
इतर साहित्याचा उल्लेख करु नका
पहिल्या रात्री संबंध ठेवण्यापूर्वी तरुणी गर्भधारणा रोखणार्या साहित्याचा उल्लेख करतात. हे तरुणांना अजिबात आवडत नाही. कारण चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी खऱ्या नसतात आणि त्याच अपेक्षा ठेवल्याने तुमची पहिली रात्र खराब होऊ शकते. त्यामुळे पहिली रात्र आहे तशी एन्जॉय करा. दुसर्या दिवशी तुम्ही याचा विचार करु शकता. दोघांच्या संमतीने याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. आता अशा गोळ्याही उपलब्ध असतात.
पहिल्या रात्री मनमोकळा संवाद साधताना पतीच्या एक्सचा उल्लेख करु नका. पतीच्या एक्सचा उल्लेख आला की तुमच्या एक्सचा उल्लेख येणार. तरुणींचे आतापर्यंत कोणासोबत नातेसंबंध राहिले आहेत, यावर चर्चा होणार. हे तरुणांना अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे हा विषयच चर्चेला घेऊ नका. उलट दुसरे रंजक विषय घेऊन त्यावर चर्चा करा. एकमेकांना समजून घ्या.
57
अनाश्यक अपेक्षा बाळगू नका
अनेकदा तरुणी आपल्या पहिल्या रात्रीची खूप आधीपासूनच योजना आखतात, ज्यामुळे त्या ताणतणावाखाली येतात. पण पहिल्या रात्रीबद्दल स्वतःवर ताण घेण्याची गरज नाही. त्यामुळे कोणतीही अपेक्षा ठेवू नका. पुरुष अशी सुरवात करतील, अशी प्रक्रिया पुढे जाईल, असे स्वप्नेही रंगवू नका. पुरुषांची पद्धत वेगळी राहू शकते. त्यांच्या प्रायॉरिटी वेगळ्या राहू शकतात. त्या तुम्ही समजून घ्यायला हव्यात. ही चूक तुमची लग्नाची पहिली रात्र खराब करू शकते.
67
वाद घालू नका
कोणतेही लग्न परिपूर्ण नसते. कुठे ना कुठे काहीतरी चूक होते आणि व्यवस्था बिघडू शकतात. शिवाय, अनेक लग्नांमध्ये वाद होतात. अशा परिस्थितीत, लग्नाच्या पहिल्या रात्री हा विषय शक्यतोवर टाळा. लग्नात तुमची आई बरोबर वागली नाही, तुमच्या वडीलांनी ही चुक केली, तुम्ही असे करायला हवे होते असे मुद्दे अजिबात मांडू नका. याने तुमची रात्र खराब होईल. शिवाय झालेल्या चुका सुधारताही येणार नाही. काही दिवसांनी योग्य वेळ बघून याची चर्चा करा.
77
मॉडर्न आऊटफिट टाळा
लग्नाच्या पहिल्या रात्री काही तरुणी मॉडर्न आऊटफिट घालतात. कारण ते झोपताना अतिशय साजेशे असते. पण येथेच चुक होते. पहिल्या रात्री मॉडर्न आऊटफिट टाळा. त्यानंतर येणार्या रात्रींमध्ये तुम्ही असे कपडे नेसू शकता. पहिल्या रात्री नववधू साडीतच शोभून दिसते. पारंपरिक चालीरीती यावेळी पाळा. तुमच्या आईने दिलेला सल्ला टाळू नका. पहिली रात्र सुंदर राहिली तर तुमची शारीरिक आणि मानसिक संबंध अधिक मजबूत होईल. आयुष्यभर गोडवा टिकून राहिल.