Navratri 2025 : नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी देवी दुर्गेच्या या नऊ रुपांची होते पूजा

Published : Sep 17, 2025, 11:15 AM IST

Navratri 2025 : देशभरात येत्या 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. अशातच नऊ दिवसांच्या या उत्सावात प्रत्येक दिवशी देवीच्या वेगवेगळ्या नऊ रुपांची पूजा केली जाते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

PREV
15
पहिला दिवस – शैलपुत्री

शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्री यांची पूजा केली जाते. हिमालयराजाच्या कन्या असल्यामुळे त्यांना शैलपुत्री म्हटले जाते. बैलावर आरूढ झालेली आणि हातात त्रिशूल व कमळ धारण केलेली ही देवी अध्यात्मिक शक्तीचे प्रतीक मानली जाते. पहिल्या दिवशीची पूजा आत्मबल आणि स्थैर्य वाढवते असे मानले जाते.

25
दुसरा ते चौथा दिवस – ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा आणि कूष्मांडा

दुसऱ्या दिवशीची देवी ब्रह्मचारिणी आहे, जी तपश्चर्या व संयमाचे प्रतीक मानली जाते. तिच्या पूजेने साधकाला ज्ञान व वैराग्य प्राप्त होते. तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. तिच्या कपाळावर अर्धचंद्र असून ती शौर्य व निर्भयतेचे प्रतीक मानली जाते. चौथ्या दिवशी कूष्मांडा देवीची उपासना होते. ब्रह्मांड निर्मितीची शक्ती तिच्यात आहे, असे मानले जाते. तिच्या कृपेने आयुष्य निरोगी आणि तेजस्वी बनते.

35
पाचवा ते सातवा दिवस – स्कंदमाता, कात्यायनी व कालरात्री

पाचव्या दिवशी स्कंदमाताची पूजा केली जाते. ती कार्तिकेय (स्कंद)ची माता असून भक्तांना मातृसुलभ प्रेम व आशीर्वाद देते. सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची उपासना केली जाते. ती शक्तीचे मूर्त रूप मानली जाते. अविवाहित मुलींसाठी ही पूजा विशेष फलदायी मानली जाते. सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा होते. काळोखाचा नाश करणारी, दुष्ट शक्तींचा संहार करणारी ही देवी भय व संकटे दूर करते असे मानले जाते.

45
आठवा आणि नववा दिवस – महागौरी व सिद्धिदात्री

आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. तिचा वर्ण शुभ्र असून ती शुद्धता, सौंदर्य आणि पावित्र्याचे प्रतीक आहे. तिच्या कृपेने भक्तांच्या पापांचा नाश होतो व जीवनात शांती नांदते. नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची उपासना केली जाते. ती भक्तांना आठ सिद्धी आणि नऊ निद्धींचा वरदान देणारी मानली जाते. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशीची पूजा आध्यात्मिक परिपूर्णतेचे प्रतीक आहे.

55
नवरात्रीचे महत्व

या नऊ दिवसांत केलेली देवीची उपासना म्हणजे शक्तीपूजा असून, भक्तांना मानसिक व शारीरिक शक्ती, संकटांवर मात करण्याची ताकद आणि जीवनातील नवी ऊर्जा मिळते. नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची उपासना करून भक्त आत्मबल, निरोगीपणा, वैराग्य आणि समृद्धीची प्राप्ती करतात.

Read more Photos on

Recommended Stories