Navratri 2025: नवरात्र उत्सवाची रंगत यंदा 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. नऊ रात्रींमध्ये देवीची पूजा, उत्साह, रंग-बिरंगी पोशाख आणि मुख्य म्हणजे गरबा-डांडियाचा जल्लोष! पण या उत्सवात सहभागी होताना फक्त उत्साह नव्हे, तर आरोग्याचीही सजगता आवश्यक आहे.
गेल्या काही वर्षांपासून असे अनेक प्रकार समोर आले आहेत, जिथे गरबा खेळताना अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे गरबा खेळायला जात असाल, तर पुढील आरोग्यविषयक टिप्स लक्षात ठेवाव्यात.