
Narli Bhat Recipe : आज नारळी पौर्णिमेचा सण साजरा केला जात आहे. यानिमित्त गोडाचा पदार्थ म्हणून खास नारळी भात तयार केला जातो. याची रेसिपी खाली स्टेप बाय स्टेप सविस्तर जाणून घेऊया.
साहित्य :
तांदूळ शिजवून घ्या :
1 कप तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. या तांदळामध्ये 1:2 च्या प्रमाणात पाणी घाला (1 कप तांदूळ = 2 कप पाणी) आणि साधारणपणे १०–१२ मिनिटात मऊ शिजेपर्यंत शिजवा. तांदूळ शिजल्यावर मोकळा करुन ठेवा.
फोडणी तयार करा :
एका पॅनमध्ये तेल गरम करा. तेलात मोहरी, उडीद दाळ आणि चणा दाळ घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. आता तेलातच भाजलेले काजू/शेंगदाणे घालून हलके भाजून घ्या. यानंतर हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि हिंग घाला. जर आवडत असेल तर आले सुद्धा घालू शकता. हळद घातल्यास नारळी भाताला हलका रंग येतो.
नारळ परतून घ्या :
गरम फोडणीमध्ये किसलेला नारळ घाला. मध्यम आचेवर २–३ मिनिटे सतत परतत राहा, म्हणजे नारळाचा कच्चा वास निघून जात त्याला सुंगध येईल. लक्षात ठेवा.
शिवजेलाला भात मिक्स करा :
फोडणीतील नारळात शिजवलेला भात मिक्स करा. यानंतर आवश्यक असल्यास मीठ आणि 1 टीस्पून लिंबाचा रस घाला. सर्व सामग्री घालून पुन्हा परतून घ्या. यानंतर मध्यम आचेवर 2-3 मिनिट शिजवत ठेवा.
भाताची सजावट :
भाताच्या सजावटीसाठी वरुन कोथिंबीर, काजू घालून गरमागरम खाण्यासाठी सर्व्ह करा.