Mumbai | Vasai | झेब्रा क्रॉसिंगवर बाईक आडवी लावली, थेट बाईकवरुनच रस्ता ओलांडला!

Published : Jul 08, 2026, 08:03 PM IST
zebra crossing

सार

मुंबईच्या वसईमध्ये एक बाईकस्वार सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगवर थांबला. तेव्हा एका पादचाऱ्याने त्याला चांगलाच धडा शिकवला. तो चक्क बाईकच्या वरून चालत पलीकडे गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 वसई  : भारतात ट्रॅफिक नियमांचं पालन करायला लोक अनेकदा कंटाळा करतात. सिग्नल तोडणं, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी थांबवणं हे तर नेहमीचंच. यामुळे रोज अनेक अपघातही होतात. पण अशाच एका बेशिस्त बाईकस्वाराला एका पादचाऱ्याने चांगलाच धडा शिकवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ही घटना मुंबईच्या वसईमधील आहे. रस्त्यावर रेड सिग्नल लागलेला असताना, एक बाईकस्वार बरोबर झेब्रा क्रॉसिंगवर येऊन थांबला. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडायला अडचण होत होती. अनेक जण बाईकला वळसा घालून जात होते, पण एका तरुणाने मात्र त्याला चांगलीच अद्दल घडवली. तो तरुण झेब्रा क्रॉसिंगवरून चालत आला आणि बाईकजवळ आल्यावर त्याने वळसा घालण्याऐवजी थेट बाईकवर पाय ठेवून पलीकडे उडी मारली.

या प्रकाराने बाईकस्वार पुरता गोंधळून गेला. यानंतर त्या तरुणाने बाईकस्वाराला ट्रॅफिक नियमांचं पालन करण्याबद्दल सुनावलं. विशेष म्हणजे, या तरुणाच्या कृतीचा परिणाम झाला. तो बाईकस्वार लगेचच आपली बाईक झेब्रा क्रॉसिंगच्या मागे घेताना व्हिडिओमध्ये दिसतोय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Navratri 2026 Fashion: जुन्या कपड्यांना द्या नवा लूक, नवरात्रीसाठी ९ भन्नाट आयडिया!
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स