Motorola च्या या प्रीमियम स्मार्टफोनवर तब्बल 5 हजारांपर्यंत सूट, वाचा डीलबद्दल सर्वकाही

Published : Jan 31, 2026, 12:10 PM IST
Motorola Flagship Smartphone

सार

Motorola Flagship Smartphone : मोटोरोला सिग्नेचर स्मार्टफोन आता विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फ्लॅगशिप फोनमध्ये १६ जीबी रॅम, स्नॅपड्रॅगन ८ जनरल ५ प्रोसेसर, ५२०० एमएएच बॅटरी, मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस २ आहे.  

Motorola Flagship Smartphone : मोटोरोलाचा प्रीमियम-फीचर्ड स्मार्टफोन Motorola Signature आता विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. तुम्ही जर फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा फोन तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. या फोनमध्ये 16GB पर्यंत RAM, दमदार Snapdragon chipset, 5200mAh battery, military-grade durability आणि Corning Gorilla Glass Victus 2 सारखी प्रीमियम वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची किंमत आणि खास फीचर्स.

भारतामध्ये Motorola Signature ची किंमत

Motorola Signature चा 12GB RAM + 256GB storage व्हेरिएंट Rs 59,999 मध्ये उपलब्ध आहे. तर 16GB RAM + 512GB storage व्हेरिएंटची किंमत 64,999 ठेवण्यात आली आहे. याशिवाय, 16GB RAM + 1TB storage असलेला टॉप व्हेरिएंट 69,999 मध्ये खरेदी करता येणार आहे.

Motorola Signature चे पर्याय

हा प्रीमियम Motorola स्मार्टफोन OnePlus 15, Realme GT 7 Pro आणि Samsung Galaxy S25 FE या स्मार्टफोनना थेट टक्कर देतो. हे सर्व स्मार्टफोन 50,000 ते Rs 70,000 या किंमत श्रेणीत बाजारात उपलब्ध आहेत.

फ्लिपकार्टवरील ऑफर

हा स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आकर्षक बँक ऑफर्स दिल्या जात आहेत. HDFC आणि Axis Bank कार्डवर non-EMI transaction वर  5,000 पर्यंत सूट मिळू शकते. तसेच HDFC आणि Axis Bank credit card EMI व्यवहारांवर 5,500 पर्यंत सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

मोटोरोला सिग्रेचरचे फीचर्स

डिस्प्ले

या स्मार्टफोनमध्ये 6.8-inch Super HD AMOLED display देण्यात आला असून तो 165Hz refresh rate ला सपोर्ट करतो. डिस्प्लेमध्ये Dolby Vision, HDR10+ support आणि 6200 nits peak brightness देण्यात आली आहे. तसेच Smart Water Touch feature मुळे ओल्या बोटांनीही फोन सहज वापरता येतो.

प्रोसेसर

फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 5 octa-core processor देण्यात आला असून तो वेगवान परफॉर्मन्स आणि स्मूथ मल्टीटास्किंगसाठी ओळखला जातो.

कॅमेरा

फोनच्या मागील बाजूस 50MP Sony LYT-828 primary sensor (OIS), 50MP ultra-wide sensor आणि 50MP Sony LYT-600 sensor देण्यात आला आहे. हा फोन 3x optical zoom आणि 100x hybrid zoom सपोर्ट करतो. समोरील बाजूस 50MP Sony LYT-500 front camera आहे. याशिवाय, फोन 8K/30fps video recording सुद्धा सपोर्ट करतो.

बॅटरी

Motorola Signature मध्ये 5200mAh battery देण्यात आली असून ती 90W wired charging आणि 50W wireless charging ला सपोर्ट करते. याशिवाय 5W wired reverse charging आणि 10W wireless reverse charging फीचरही उपलब्ध आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, हा फोन एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 41 hours पर्यंत बॅटरी बॅकअप देतो.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

गुबगुबीत गाल लपवण्यासाठी 6 सुंदर हेअरस्टाईल्स
दुधी भोपळा वाढवण्याच्या टिप्स: बाल्कनीमध्ये दुधी लावण्याचे 5 सोपे टप्पे