Morning Alarm : सकाळी उठण्यासाठी अलार्म लावता? कर्णकर्कश अलार्म हृदयासाठी ठरू शकतो मोठा धोका, तज्ज्ञांचा इशारा!

Published : Sep 23, 2025, 04:40 PM IST

Morning Alarm : पहाटे किंवा भल्या सकाळी उठायचे असेल तर अलार्म लावल्याशिवाय होत नाही. पण अलार्म लावल्यावर दचकून उठणे हे शरीरासाठी धोकादायक आहे. शरीर शांत झोपेत असताना तुम्ही त्याला उठवता. जाणून घ्या यावर तज्ज्ञ काय सांगतात.

PREV
17
अलार्ममुळे हृदयाच्या आरोग्यावर होणारे परिणाम

आपले शरीर एका ठराविक वेळी झोपण्यासाठी आणि उठण्यासाठी बनलेले आहे (जैविक घड्याळ). झोपण्याची-उठण्याची वेळ बदलल्यामुळे अलार्मची गरज भासते. पण अलार्म लावणे शरीरासाठी धोकादायक ठरू शकते. याचा हृदयावर विपरित परिणाम होतो.

27
अलार्म आणि स्ट्रेस हार्मोन

अलार्ममुळे शाळा, कामावर वेळेवर पोहोचता येते. पण तज्ज्ञ सांगतात की, यामुळे मेंदू आणि हृदयावर ताण येतो. अलार्म शरीराला गाढ झोपेतून अचानक जागे करतो, ज्यामुळे स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोल वाढतो. शरीराला एक धक्का बसतो. यातून त्याला सावरावे लागते.

37
कॉर्टिसोल आणि हृदयाच्या समस्या

साधारणपणे, सकाळी उठल्यावर कॉर्टिसोल हळूहळू वाढतो आणि शरीराला ताजेतवाने करतो. पण अलार्ममुळे तो वेगाने वाढतो आणि तणाव निर्माण करतो. यामुळेच हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वेगळा पर्याय अवलंबावा लागला तर विचार करुन बघा.

47
रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढण्याचा धोका

गाढ झोपेतून अचानक जाग आल्याने रक्तदाब आणि हृदयाचे ठोके काही सेकंदात वेगाने वाढतात. यामुळे हृदयाच्या रुग्णांना गंभीर धोका होऊ शकतो आणि निरोगी व्यक्तीच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. या अलार्मचा थेट हृद्यावर परिणाम होतो.

57
अलार्मचा मेंदूवर होणारा परिणाम

अलार्ममुळे हृदयावर ताण येतोच, पण मेंदूवरही परिणाम होतो. यामुळे 'स्लीप इनर्शिया' होतो, ज्यामुळे सकाळी उठल्यावर थकवा आणि आळस जाणवतो. याकडे दुर्लक्ष केल्यास मूड आणि कामावर परिणाम होऊ शकतो. दिवस अगदी आळसात जातो.

67
अलार्मशिवाय जागे कसे व्हावे? सोपे मार्ग!

अलार्मशिवाय नैसर्गिकरित्या उठल्याने शरीराला चांगली विश्रांती मिळते. हृदयावर कोणताही ताण येत नाही आणि स्ट्रेस हार्मोन्स वाढत नाहीत. यामुळे दिवसभर ताजेतवाने आणि उत्साही वाटते. त्यासाठी तुम्ही लवकर झोपून लवकर उठू शकता. किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुम्हाला उठवायला सांगू शकता.

77
अलार्म टाळणे शक्य नसल्यास काय करावे?

प्रत्येकाला अलार्मशिवाय उठणे शक्य नसते. पण चांगली जीवनशैली अवलंबल्यास हे शक्य आहे. जर तुम्हाला अलार्म लावणे टाळता येत नसेल, तर मंद आवाजाचा अलार्म लावणे चांगले. एखादे गोड गाणे किंवा संगीत अलार्मच्या जागी लावून तुम्ही सकाळ सुखद करु शकता.

Read more Photos on

Recommended Stories