
Money Plant: तुमच्या घरातलं मनी प्लांट अचानक सुकायला लागलंय का? पानं पिवळी होऊन गळत आहेत? तुम्हाला वाटतंय का हे सामान्य आहे? पण शास्त्र मात्र वेगळंच सांगतं. शास्त्रानुसार, मनी प्लांट सुकणे याचा अर्थ तुमच्या घरावर कोणतं तरी मोठं आर्थिक संकट येणार आहे (Money Plant). वास्तू आणि ज्योतिषशास्त्रामध्ये मनी प्लांटला देवी लक्ष्मी आणि कुबेर यांचा प्रतीक मानलं जातं. त्यामुळे या झाडावर पिवळी पानं किंवा सुकलेल्या फांद्या दिसणं म्हणजेच खिसा रिकामा होण्याची वेळ आली आहे. ज्योतिषी सांगतात की, कदाचित आगामी काळात अशी एखादी वाईट बातमी येऊ शकते ज्यामुळे तुमची साठवलेली पुंजी पाण्यासारखी खर्च होईल. अचानक आजारपण, नोकरीत समस्या किंवा मोठं नुकसान होऊ शकतं.
१. सुकलेली पानं कापून टाका: सगळ्यात आधी एका स्वच्छ कात्रीने झाडाची पिवळी किंवा सुकलेली पानं लगेच कापून टाका. शास्त्रानुसार, झाडावर सुकलेली पानं राहणं अजिबात चांगलं नाही. यामुळे घरात निगेटिव्ह एनर्जी वाढते आणि आर्थिक नुकसान अधिक वेगाने होतं.
२. फांद्या छाटा: फक्त पानंच नाही, तर मनी प्लांटच्या सुकलेल्या फांद्याही छाटणं शहाणपणाचं काम आहे. यामुळे झाडाला नव्याने जगण्याची ताकद मिळते. वास्तूनुसार, सुकलेल्या फांद्या कापल्याने अडकलेलं दुर्भाग्यही दूर होतं.
३. योग्य प्रकाश आणि हवा द्या: तुम्ही झाड कुठे ठेवलंय याकडे थोडं लक्ष द्या. झाडाला पुरेसा प्रकाश आणि हवा मिळेल याची काळजी घ्या. वास्तूनुसार, मनी प्लांट ईशान्य दिशेला ठेवणं शुभ मानलं जातं. पण कडक उन्हात मनी प्लांट ठेवू नका, यामुळे पानं लवकर जळतात. आठवड्यातून २-३ वेळा पाणी बदला किंवा माती हलकी ओलसर ठेवा.
४. लाल धाग्याचा उपाय - सर्वात प्रभावी: ज्योतिषशास्त्रात एक उत्तम उपाय सांगितला आहे. शुक्रवारी, जो देवी लक्ष्मीचा दिवस आहे, मनी प्लांटच्या कुंडीभोवती किंवा मुळाजवळ एक लाल धागा किंवा मौली बांधा. ज्योतिष्यांच्या मते, लाल रंग नकारात्मक ऊर्जेला दूर ठेवतो. हे छोटंसं काम केल्याने वास्तूचा वाईट प्रभाव खूप वेगाने कमी होतो आणि खर्चाची भीतीही कमी होते. आर्थिक समृद्धी परत येते.
लक्षात ठेवा, झाड फक्त शोभा वाढवत नाही, तर तुमच्या नशिबाचा संकेतही देतं. त्यामुळे दुर्लक्ष न करता आजच त्याची काळजी घ्या.