ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला नवग्रहांचा राजकुमार म्हणतात. बुद्धिमत्ता, वाणी, शिक्षण, व्यापार आणि त्वरित निर्णय घेण्याची क्षमता बुधावर अवलंबून असते. मिथुन आणि कन्या राशीचा स्वामी असलेला बुध साधारणपणे एका राशीत २१ दिवस राहतो.
सध्या स्वतःच्या कन्या राशीत असलेला बुध २६ सप्टेंबरला तूळ राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या मालकीच्या तूळ राशीत बुधाचा हा प्रवेश सर्व राशींवर परिणाम करेल. यामुळे काहींना फायदा होईल, तर ३ राशींच्या लोकांनी आर्थिक आणि व्यावसायिक जीवनात सावध राहायला हवे. त्या ३ राशी कोणत्या ते पाहूया.