Mercury Mars Conjunction : 20 ऑक्टोबर 2025 रोजी होणारी बुध आणि मंगळ ग्रहांची युती तीन राशींच्या लोकांसाठी नवीन संधींचे दरवाजे उघडू शकते. दिवाळीला या लोकांवर लक्ष्मीची कृपा असल्याचे दिसून येते. जाणून घ्या या तीन भाग्यवान राशिंबद्दल…
वैदिक ज्योतिषानुसार बुध आणि मंगळ विरुद्ध ग्रह आहेत, पण त्यांच्या युतीमुळे व्यक्तीमध्ये तीव्र बुद्धिमत्ता आणि कार्यक्षमता वाढते. 20 ऑक्टोबर 2025 रोजी वृश्चिक राशीत ही युती होत आहे.
24
वृश्चिक राशी
20 ऑक्टोबरला वृश्चिक राशीत होणारी बुध-मंगळ युती आत्मविश्वास वाढवेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांना महत्त्व मिळेल आणि नात्यात स्पष्टता येईल.
34
कर्क राशी
बुध-मंगळ युती कर्क राशीच्या लोकांसाठी सर्जनशीलता घेऊन येईल. शिक्षण, मीडिया किंवा कला क्षेत्रातील लोकांना विशेष फायदा होईल. रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि चांगली बातमी मिळू शकते.
सिंह राशीच्या लोकांसाठी ही युती आनंद आणि आत्मविश्वास वाढवेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद वाढेल. मालमत्ता किंवा वाहनाशी संबंधित लाभ मिळू शकतात. सामाजिक प्रतिष्ठा वाढवण्यासाठी हा चांगला काळ आहे.