
दिवाळीनंतर, विशेषतः १३ नोव्हेंबरला रात्री ९:२२ च्या सुमारास बुध ग्रह तूळ राशीत आपली वक्री चाल संपवून मार्गी लागणार आहे. २४ ऑक्टोबरपासून वक्री असलेला बुध आता सरळ चाल चालणार असल्याने अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील. व्यवसायातही मोठी वाढ पाहायला मिळेल.
मेष
मेष राशीच्या लोकांसाठी ऑफिसमध्ये स्वतःला सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. व्यावसायिक लोक आपल्या ओळखीचा वापर करून नवीन करार करू शकतात.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांनी आखलेल्या योजना यशस्वीपणे पूर्ण होतील. वरिष्ठांशी चांगला संवाद साधल्याने ऑफिसमध्ये तुमची ओळख निर्माण होईल. उत्पन्न आणि खर्च यात समतोल राखणे फायद्याचे ठरेल.
मिथुन
बुध हा मिथुन राशीचा स्वामी असल्याने, या ग्रहाची सरळ चाल तुम्हाला शुभ फळ देईल. तुमचे विचार स्पष्टपणे मांडून तुम्ही सर्वांचे लक्ष वेधून घ्याल. मीडिया आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर आहे.
कन्या
कन्या राशीच्या लोकांच्या कामात सुधारणा दिसेल. तुमची रखडलेली कामे तुम्ही सहज पूर्ण करू शकाल. व्यवसाय वाढवण्यासाठी आणि नवीन ग्राहकांना जोडण्यासाठी ही अतिशय अनुकूल वेळ आहे.
सिंह
सिंह राशीच्या लोकांना त्यांच्या कौशल्याला आणि मेहनतीला योग्य व्यासपीठ मिळेल. यामुळे त्यांच्या करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. व्यावसायिक लोक आपली उत्पादने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी होतील.
तूळ
बुध ग्रह तूळ राशीतच मार्गी होत असल्याने तुमची निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल. रखडलेले व्यवहार पुन्हा सुरू होतील आणि तुम्हाला नोकरीच्या नवीन संधी मिळतील.
मकर
मकर राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची पूर्ण साथ मिळेल, त्यामुळे कामे सुरळीत पार पडतील. व्यवसायात जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क साधणे फायद्याचे ठरेल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आणि व्यावसायिक नेटवर्क वाढवण्यासाठी हा खूप चांगला काळ आहे. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत, त्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. तसेच, बाजाराचा योग्य अभ्यास करून केलेली गुंतवणूक चांगला परतावा देईल.