मुलीला मदत करण्यासाठी सगळे पुढे येतात, पण मुलगा नेहमी दुसरा पर्याय असतो
मुलगे काहीतरी करायचं ठरवलं तर ते स्वतःच करावं लागतं. इतरांकडून मदतीची अपेक्षा करणे कठीण आहे. कारण कोणीही त्यांच्या मदतीला येत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर मुलगा-मुलगी बाईकवरून जाताना अपघात झाला तर, मुलीच्या काळजीसाठी सगळे पुढे येतात. तिला उपचार देणे, पाणी पाजणे हे सगळं आधी करतात, पण मुलाला, छोटीशी दुखापत आहे ना, तू ठीक आहेस ना? गाडी चालवू शकतोस ना? एवढंच विचारतात. कारण पुरुष इतरांना मदत करणारे असतात, त्यांनाही मदत हवी असते हे कोणालाच वाटत नाही.