Makar Sankranti 2026 Wishes : आज (१४ जानेवारी) देशभरात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जात आहे. या सणाला उगाडी, लोहरी अशा नावाने देखील ओळखले जाते. यानिमित्त मित्रपरिवाराला खास संदेश, शुभेच्छापत्र पाठवत सण साजरा करा.
मकर संक्रांती हा भारतातील एक अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण असून, या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात. उत्तरायणाच्या प्रारंभाचे प्रतीक असलेला हा सण नवीन ऊर्जा, सकारात्मकता आणि समृद्धी घेऊन येतो. तिळगुळाच्या गोडव्याने नाती अधिक घट्ट करण्याचा आणि आनंद वाटून घेण्याचा संदेश मकर संक्रांती देते. यानिमित्त मित्रपरिवाराला खास मेसेज, संदेश पाठवून सण साजरा करा.
26
मकर संक्रांत २०२६ शुभेच्छा
या मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा दूर होवो, सुख-समृद्धी, आरोग्य आणि यश तुमच्या घरात नांदू दे. तिळगुळासारखे गोड नाते आणि सूर्यप्रकाशासारखी तेजस्वी वाटचाल लाभो, ह्याच मनःपूर्वक शुभेच्छा!
36
मकर संक्रांत २०२६ शुभेच्छा
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने साजरा करा. तुमचे स्वप्न पूर्ण व्हावीत, कष्टांना यश लाभो आणि आयुष्य नेहमी आनंदी राहो, हीच मकर संक्रांतीच्या शुभेच्छा!
या संक्रांतीच्या दिवशी तुमच्या जीवनातील अंधार दूर होवो आणि यशाचा सूर्य सदैव तेजस्वी राहो. आरोग्य, समाधान, प्रेम आणि प्रगती तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनो.
56
मकर संक्रांत २०२६ शुभेच्छा
सूर्याच्या उत्तरायणासोबत तुमच्या जीवनातही नवे विचार, नवी दिशा आणि नवी आशा उजळो. दुःख मागे पडो आणि आनंद, समाधान व यश तुमच्या पावलोपावली सोबत असो. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!
66
मकर संक्रांत २०२६ शुभेच्छा
नवे वर्ष, नवे संकल्प आणि नवी उमेद घेऊन येणारी मकर संक्रांती तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो. तिळगुळासारखा गोडवा तुमच्या नात्यांत सदैव टिकून राहो.