अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट जन्मांक असलेले लोक 'पैशाचे चुंबक' असतात. त्यांच्या जन्मतारखेतील ऊर्जेमुळे त्यांच्या आयुष्यात अचानक पैसा येतो आणि ते लवकरच करोडपती आणि श्रीमंत होतात.
अंकशास्त्रानुसार काही लोक खरंच 'पैशाचे चुंबक' असतात. हे लोक अचानक त्यांच्या आयुष्यात प्रचंड संपत्तीचे मालक बनतात. त्यांचं नशीब इतकं चमकतं की ते करोडपती होतात. अंकशास्त्रानुसार, हे अपघाताने घडत नाही, तर त्यांच्या जन्मतारखेत लपलेल्या अंकांच्या शक्तीमुळे घडतं. या शास्त्रानुसार, काही भाग्यवान अंक पैशाला चुंबकासारखे आकर्षित करतात. चला, जाणून घेऊया कोणते आहेत ते भाग्यवान अंक.
24
मूलांक १ - धाडसातून मिळणारी संपत्ती
अंकशास्त्रात १ या अंकाला 'राजा' मानलं जातं. हे लोक जन्मतःच नेते आणि धाडसी असतात. हे लोक त्यांच्या बुद्धिमत्तेने आणि स्पष्ट निर्णयांनी करिअर आणि व्यवसायात मोठं यश मिळवतात. त्यांना अनेकदा अचानक आर्थिक लाभाच्या संधी मिळतात आणि समाजात प्रतिष्ठाही मिळते. लोक त्यांच्या मागे चालतात. याच गुणामुळे ते मोठं नेटवर्क तयार करतात आणि आपली कामं पूर्ण करून घेतात. ते खूप प्रामाणिक असतात आणि प्रत्येकाच्या योगदानाचा आदर करतात.
34
मूलांक ५ - व्यवसायाचा राजा
अंकशास्त्रानुसार, ५ या मूलांकात जन्मलेले लोक संपत्तीच्या बाबतीत भाग्यवान असतात. या अंकावर बुध ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे या अंकाचे लोक बोलण्यात, व्यवसायात आणि संवादात निपुण असतात. बौद्धिक कौशल्य असलेले हे लोक करिअर आणि व्यवसायात जोखीम घ्यायला घाबरत नाहीत. 'डर के आगे जीत है' हा डायलॉग जणू त्यांच्यासाठीच बनला आहे. आपल्या हुशारीने हे लोक स्वतःचं साम्राज्य उभं करतात. उत्तम संवाद कौशल्य आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयामुळे ते मोठी संपत्ती जमा करतात.
अंकशास्त्रानुसार, ६ या मूलांकावर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. या अंकाचे लोक ऐषारामाचं जीवन जगतात. याचा अर्थ असा नाही की त्यांना हे आपोआप मिळतं. ते आराम आणि समृद्धी मिळवण्यासाठी खूप मेहनत करतात. त्यांना वडिलोपार्जित संपत्तीचा वारसा मिळतो. तसेच लॉटरी, शेअर बाजार आणि इतर मार्गांनीही त्यांना मोठा धनलाभ होतो.