Heart Health : सणांचा उत्साह जीवावर बेतू शकतो! डीजेच्या आवाजाने हृदयाचा वाढतो धोका

Published : Sep 15, 2026, 03:10 PM IST
dj

सार

सणासुदीच्या दिवसात डीजे आणि लाऊडस्पीकरचा दणदणाट असतोच. पण या आवाजाचा आणि आपल्या हृदयाच्या आरोग्याचा थेट संबंध आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? डॉक्टरांनी याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे.

मुंबई : भारतात सध्या सणासुदीचे दिवस आहेत. सगळीकडे गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. आपल्याकडे सण म्हणजे फक्त पूजा नाही, तर तो एक मोठा उत्सव असतो. यात उत्साह, संगीत आणि जल्लोष या सगळ्या गोष्टी एकत्र येतात. सणांच्या दिवसात डीजे, लाऊडस्पीकर, डॉल्बी आणि फटाक्यांचा आवाज तर असतोच. पण हाच आवाज कधीकधी आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः अचानक आणि मोठा आवाज थेट आपल्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम करतो.

लाऊडस्पीकर हृदयासाठी हानिकारक

तज्ज्ञांच्या मते, अचानक मोठा आवाज ऐकल्याने शरीरात एक प्रकारची 'स्ट्रेस रिॲक्शन' सुरू होते. अशावेळी आपलं शरीर अलर्ट मोडवर जातं. स्ट्रेस हार्मोन्स वाढल्यामुळे हृदयाचे ठोके वेगाने वाढतात. काहींना तर तात्पुरता हाय ब्लड प्रेशरचा त्रासही होऊ शकतो.

सणांच्या काळात तासन्तास मोठ्या आवाजात राहिल्याने शरीरावरचा ताण आणखी वाढतो. ज्यांना आधीच हाय बीपी, हृदयाशी संबंधित आजार, हार्ट फेल्युअर किंवा हृदयाच्या ठोक्यांची समस्या आहे, त्यांनी तर जास्त काळजी घ्यायला हवी. मोठा आवाज अशा लोकांमध्ये चिंता आणि तणाव वाढवून हृदयावरील भार वाढवू शकतो.

सणांच्या दिवसात लोक रात्री उशिरापर्यंत जल्लोष करतात. डीजे, लाऊडस्पीकर किंवा फटाक्यांचा आवाज रात्रीही सुरू असतो. यामुळे झोपेचं खोबरं होतं. अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील ताण वाढतो आणि त्याचा परिणाम रक्तदाब आणि हृदयाच्या एकूण आरोग्यावर होतो. घरातील लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना शक्यतो मोठ्या आवाजापासून दूर ठेवावं. घराच्या आसपास खूप आवाज असेल, तर काही वेळ शांत खोलीत जाऊन बसा.

सणांच्या उत्साहात संगीत आणि जल्लोष हवाच, पण आवाजाच्या पातळीकडेही लक्ष द्यायला हवं. डीजे आणि लाऊडस्पीकरचा आवाज मर्यादेत ठेवणं, रात्री उशिरापर्यंत मोठा आवाज टाळणं आणि वृद्ध, लहान मुलं व आजारी लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

PREV
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Gold Earrings : फक्त 3 ग्रॅममध्ये मिळणारे सुंदर झुमके, पाहा डिझाईन्स
Blood Sugar Control : शुगर कंट्रोल करायचीय? रोज ही 5 पेये पिणे टाळा